Holika Dahan 2024 : हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं. यंदा होलिका दहन येत्या रविवारी 24 मार्चला असणार आहे. देशभरात होलिका दहनासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. होलिका दहन हे वाईटवर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो. होलिका दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे. होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. खरं तर हिंदू धर्मात नारळ म्हणजे श्रीफळाशिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा पूजा ही अपर्ण मानली जाते. पण तुम्हाला कधी विचार केला का की, होलिका दहनाच्या वेळी नारळ का अर्पण करतात? (Why is coconut offered in Holi How to offer it Find out what astrologers say astrology tips)
ज्योतिष अभ्यासक सचिन मधुकर परांजपे यांनी श्रीफळ का अर्पण करतात आणि होळीत नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत याबद्दल सांगितलं आहे.
नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्याने त्याला पूजेत अतिशय महत्त्व आहे. नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. दक्षिण भारतात नारळाला हरा सोना म्हटलं जातं. होलिका दहनाचे अग्नि अत्यंत पवित्र आध्यात्मकमध्ये अतिशय पवित्र मानला गेला आहे. होलिका दहनाच्या अग्नीत जी काही वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फल प्राप्तसाठी होतो अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे.
अशा वेळी होलिका दहनाच्या आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते. कर्जाचा बोझा दूर होतो. त्याशिवाय नारळाबाबत अशी एक समजूत आहे की नारळाला अग्नीत जाळल्याने ते व्यक्तीचे आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आशीर्वाद प्राप्त होतो. होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमचं अनेक दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागतात असं म्हणतात.
पंचांगानुसार 24 मार्च 2024 ला रात्री 11.31 वाजेपासून रात्री 12.27 वाजेपर्यंत पूजा करता येणार आहे. या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून, धरण्याची पद्धत शेंडी बाहेरच्या बाजूने असावी. हे नारळ घरातून फिरवून होळीच्या अग्नीत अर्पण करावे. होळी दहनाचा मुहूर्तावर तो अर्पण करावा. जर होलिका दहन होण्यास वेळ असेल तर तो नारळ घराच्या बाहेर ठेवावा. एक गोष्ट लक्षात ठेवा हा नारळ फिरवताना खाली मंत्राचा जप करावा.
“ॐ सर्वाबाधा-विनिर्मुक्तो, धनधान्यसुतान्वितः।
मनुष्यो मत्प्रसादेन् भविष्यति न संशयः।।”
हा मंत्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार 11/21/108 वेळा करु शकता. या उपायाने घरातील रोगराई, नकारात्मकता नष्ट होते.
हेसुद्धा वाचा - Holi 2024 Date : होळी आणि धुलिवंदन कधी? चंद्रग्रहण सावली असल्याने जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.