आजचे राशीभविष्य : आषाढी एकादशीचं पर्व 'या' राशींसाठी ठरणार फलदायी

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Jul 1, 2020, 07:26 AM IST
आजचे राशीभविष्य : आषाढी एकादशीचं पर्व 'या' राशींसाठी ठरणार फलदायी
संग्रहित छायाचित्र

मेष- अनेक दिवसांपासून सुरु असणारी कामं पूर्ण होतील. कुटुंबाचे संबंध आणखी दृढ होतील. दिवस उत्साही असेल. प्रेमसंबंध यशस्वी ठरतील. 

वृषभ- कामात अधिक व्यग्र असाल. इतरांकडून मान मिळेल. मेहनत करा. अपूर्ण कामं मार्गी लागतील. नव्या कामांना गती मिळेल. अविवाहितांसाठी विवाह प्रस्ताव येतील. 

मिथुन- अती घाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. वायफळ खर्च टाळा. नोकरी आणि व्यापारातील अडचणी दूर होतील. 

कर्क- नोकरीत काही अडचणी येऊ शकतात. आग्रही सुर ठेवू नका. अडचणी उदभवतील. अचानक अडचणी वाढतील. दिवस थकवणारा असेल. 

सिंह- कुटुंबात सुख- शांती नांदेल. कामाच्या ठिकाणी नवे करार होतील. कोणा एका वेगळ्याच ठिकाणी तुमचं लक्ष असेल. नोकरीच्या ठिकाणी कोणा एका हितचिंतकाकडून तुम्हाला सातत्यानं मदत होणार आहे. 

कन्या- कामाचा व्याप वाढलेला असेल. कनिष्ठांचं सहकार्य लाभेल. काही खास व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. 

तुळ- नोकरी आणि व्यवसायात यश मिळणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नशिबाची साथ असल्यामुळं तुमची बहुतांश कामं उरकणार आहेत. 

वृश्चिक- व्यवसायात फायदा तुलनेने कमी होईल. एखादं नवं काम सुरु करा. नको त्या कामांमध्ये उगाचच मन रमेल. अविवाहितांसाठी प्रेमसंबंध तणावाची परिस्थिती निर्माम करु शकतात. 

धनु- दैनंदिन कामं पूर्ण होतील. आजचा दिवस फलदायी ठरेल. साथीदारासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. जेवणात मसालेदार पदार्थांचं सेवन टाळा. 

 

मकर- आज कोणतेही नवे आर्थिक व्यवहार करु नका. मनाविरुद्ध पैसे खर्च करावे लागू शकतात. कामाचा दिवस सुस्तावणारा असेल. 

कुंभ- आर्थिक चणचण संपेल. नोकरीच्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं काम पूर्णत्वास न्याल. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. चांगल्या व्यक्तीच्या सानिध्ध्यात राहण्याचा फायदा होणार आहे. 

मीन- व्यापाराच्या कक्षा वाढवा. महागड्या वस्तूंची खरेदी टाळा. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस चांगला आहे.