Horoscope 28 September : कामात मिळणार यश, या राशींना धनलाभ होण्याची शक्यता

मंगळवारी मेष, मिथुन आणि वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता 

Updated: Sep 27, 2021, 11:09 PM IST
Horoscope 28 September : कामात मिळणार यश, या राशींना धनलाभ होण्याची शक्यता
मुंबई: मंगळवारी मेष, मिथुन आणि वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. मंगळवारी बाहेर प्रवास किंवा नातेवाईकांना भेटण्याची शक्यता आहे. खगोल गुरु बेजन दारूवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊया 12 राशींसाठी मंगळवार कसा असणार आहे. 
 
मेष: कामात यश मिळेल. प्रेमाच्या बाबतीत संवेदनशीलता दिसून येईल. विचार करून बोला. वडिलधाऱ्यांचा सन्मान करा. 
 
वृषभ: कामासाठी दिवस चांगला आहे. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अपेक्षित यश नक्कीच मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. अचानक खर्च वाढतील. दिवस चांगला जाईल. 
 
मिथुन: तुमचे नशीब चांगले राहील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन व्यवसाय योजनेवर काम करण्यासाठी हा काळ उत्तम आहे.
 
कर्क: आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा महागात पडू शकतो. तुम्हाला चांगले पैसे मिळतील.
 
सिंह: कामात चांगले यश मिळणार आहे. तुमची मेहनत आणि नशीब यांचं फळ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य बिघडू शकते.
 
कन्या: तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामासाठी दिवस चांगला असेल. 
 
तुळ: हुशारीच्या जोरावर कामं पूर्ण होतील. गोड बोलण्याने फायदा होईल. घरात शुभकार्याचा योग आहे. तुमच्या जिद्दी स्वभावामुळे कुटुंबाला त्रास होईल.
 
वृश्चिक: नशीबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन घ्या. 
 
धनु: कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. उत्साह राहील दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. 
 
मकर: शत्रूपासून सावध राहा. भाग्य साथ देईल मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. आरोग्य उत्तम राहील.
 
कुंभ: नोकरीच्या ठिकाणी मदत मिळेल. मन प्रसन्न राहील नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. 
 
मीन: मंगळवारचा दिवस खूप शुभ आहे. कामाच्या ठिकाणी चांगला फायदा होईल. 
Tags: