Horoscope 3 May 2022: मंगळवारी 'या' राशींच्या व्यक्तींना करावा लागेल संकटांचा सामना

'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, जाणून कसा असेल तुमचा आजचा दिवस...   

Updated: May 3, 2022, 07:40 AM IST
Horoscope 3 May 2022: मंगळवारी 'या' राशींच्या व्यक्तींना करावा लागेल संकटांचा सामना title=

मेष- आपल्या जीवनात प्रगतीचे मार्ग अधिक सुखकर होतील. आज आपण पुढे वाटचाल कराल. आर्थिक बळकटी मिळेल. व्यापारी वर्गाला आज नियमात राहाणं बंधनकारक असेल अन्यथा अडचणी येतील. नोकरी क्षेत्रात सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल. 

वृषभ- आपण प्रतिकूल परिस्थितीतून जात आहात. आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती अधिक मजबूत करण्यावर भर द्यायला हवा. सतर्क राहाणं गरजेचं आहे. आज घराची साफसफाई करा. 

मिथुन- आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. गुंतवणूक करताना विशेषत: प्रॉपर्टीच्या गोष्टींमध्ये अधिक लक्ष द्या. सर्वात आधी कामाची यादी तयार करा, त्यानंतर दिवसाची सुरूवात कर. कोणत्याही वादग्रस्त विषयावर आपलं मत मांडू नका. 

कर्क- आज आपल्याला अचानक फायदा मिळून शकतो. आर्थिक तणाव जाणवेल. आजचा दिवस चांगल्या पद्धतीनं घालवण्याकडे लक्ष द्या. काही जुन्या गोष्टींमुळे संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे सावध रहा.  

सिंह- व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. पैशांच्या व्यवहारात साक्षीदार असणं गरजेचं आहे. आजचा दिवस आपला चांगला जाईल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मदत मिळेल. ज्याचा फायदा तुम्हाला 100 टक्के होणार आहे. 

कन्या- प्रॅक्टिकल निर्णय घेण्यावर भर द्या. दूध व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात आज आपल्याला लाभ मिळेल. जोडीदारासोबत आपला वेळ खूप चांगला जाईल. 

तुळ- आज आपल्याला काम मेहनत घेऊन आणि इमानदारीनं करायचं आहे. व्यवहाराचे निर्णय सकारात्मक होतील. आपल्या मुलांसोबत अधिक वेळ घालवा. 

वृश्चिक- भविष्यातील गुंतवणुकीसाठी नियोजन करा. आजपासून गुंतवणूक करण्यावर भर द्या. नोकरी-व्यवसायात चांगला लाभ होईल. विरोधकांपासून सावध राहा. 

धनु- यशस्वी होण्यासाठी आज तुम्हाला खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. धीर सोडू नका. आर्थिकबाबींमध्ये सावधानी बाळगा. अपूर्ण राहिलेली कामं आज मार्गी लागतील. 

मकर- नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करू शकता. आजचा आपला दिवस चांगला जाणार आहे. कुटुंबासोबत आपला वेळ चांगला जाईल. या राशीच्या लोकांनी केवळ एक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या राशीच्या लोकांनी येणाऱ्या काळात आरोग्याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. 

कुंभ- आज आपल्याला दिवसाचं नियोजन करून त्यानुसार वागायला हवं. महत्त्वाच्या भेटीगाठी होतील. आळस आणि निष्काळजीपणामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ योग्य आहे. तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील तरच चांगले फळ मिळेल.

मीन- आज आपण आपलं महत्त्वाची गोष्ट शेअर करू शकता. आज आपला विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी विनाकारण गोंधळात पडू नका, व्यवसाय करा आणि काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा.