आजचे राशीभविष्य | सोमवार | ११ नोव्हेंबर २०१९

कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Updated: Nov 11, 2019, 08:33 AM IST
आजचे राशीभविष्य | सोमवार | ११ नोव्हेंबर २०१९ title=

मेष - जवळपासच्या लोकांमुळे चिड-चिड होण्याची शक्यता आहे. काही वेळ एकांतात राहण्याचा प्रयत्न करा. छोट्याशा गोष्टींमुळे मूड खराब होऊ शकतो. वेळ मिळाल्यास आराम करणं फायद्याचं ठरेल. इतरांसोबत वाद घालत बसू नका. 

वृषभ - अगदी शेवटच्या क्षणी कामं पूर्ण होऊ शकतात. मन प्रसन्न राहील. रखडलेल्या कामांवर पुन्हा योजना आखू शकतात. व्यस्त राहाल.

मिथुन - स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे. स्वत:च्या समस्यांमध्ये अडकण्याची शक्यता आहे. तब्येतीकडे लक्ष द्या. आराम करा. स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी आवडीच्या गोष्टींकडे करण्यावर भर द्या.

कर्क - कुटुंबियांशी संबंध सुधारण्यासाठी दिवस चांगला आहे. मोठी कामं हाताळण्यात संपूर्ण लक्ष राहील. अनेक कामं वेळेत पूर्ण होतील. नवीन अनुभव मिळतील. आज दिवस व्यस्त राहील. साथीदासोबत चांगले संबध प्रस्थापित होतील. वाद मिटण्याची शक्यता आहे. 

सिंह - कामात लक्ष लागणार नाही. नुकसानीची शक्यता आहे. सावध राहा. मित्र, नातेवाईकांसोबत घालवलेला वेळ चांगला ठरू शकतो.  नवीन ओळखी होण्याचा योग आहे. 

कन्या - आज आनंदी राहाल. दुसऱ्यांचे विचार समजून घ्याल. जवळच्यांनी दिलेला सल्ला फायद्याचा ठरु शकतो. पुढे जाण्याचे नवे मार्ग मिळू शकतात. दिवस चांगला जाईल.

तुळ - बैचेन वाटू शकते. पण याबाबत अधिक विचार करु नका. कामात मन लागणार नाही. स्वत:वर विश्वास ठेवा. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. 

वृश्चिक - आज स्वत:ला कामात पुढे न्याल. कामात लक्षकेंद्रित करा. अनेक गोष्टींचा विचार करु नका. सावध राहा. दिवस सामान्य आहे. 

धनु - नवीन ओळखी होऊ शकतात. नव्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. व्यक्तीगत विकासासाठी इतरांशी बोलून अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न करा. 

मकर - मनासारखी कामं होऊ शकतात. कामात सहकाऱ्यांची मदत मिळू शकते. घरातील जबाबदारीकडे लक्ष द्या. 

  

कुंभ- भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. काही वाद उद्भवू शकतात. मानसिक ताण वाटेल. वाहनांचा सांभाळून वापर करा. 

मीन- आज तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. काही कामांमध्ये अडचणी येतील. आरोग्य सुधारेल. सकारात्मक राहाल.