मेष - वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. परंतु वाद झाल्यास काही न बोलणं फायद्याचं ठरेल. एखादी व्यक्ती तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करु शकते. शांत राहा.
वृषभ - तुमची मतं इतरांवर लादू नका. प्रत्येकाची आपली वेगळी मतं असतात. इतरांच्या बोलण्याचा सन्मान करा. कामं वेळेत पूर्ण होतील.
मिथुन - महत्त्वाच्या कामात मित्रांची मदत मिळेल. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. जुने विचार डोकं वर काढू शकतात. जोडीदाराशी वाद असल्यास ते मिटवण्याचा प्रयत्न करा.
कर्क - कामाच्या ठिकाणी काही लोक समस्या निर्माण करु शकतात. तब्येतीची काळजी घ्या. महत्त्वाच्या गोष्टींबाबत माहिती मिळू शकते. नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
सिंह - व्यवसायात सावध राहावं लागेल. व्यवसायात मोठ्यांचा सल्ला घ्या. एकटेपणा टाळा. अर्धवट राहिलेली काम पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कन्या - कोणत्याही व्यक्तीशी वाद करु नका. कामाकडे लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. घाई करू नका. कामं पूर्ण होतील. तब्येत चांगली राहील.
तुळ - सोबत काम करणाऱ्या व्यक्तींकडून मदत होऊ शकते. जोडीदाराकडून मदत मिळू शकते. मित्रांसोबत वेळ जाईल. वायफळ खर्च होऊ शकतो. तब्येतीकडे लक्ष द्या.
वृश्चिक - इतरांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. अधिक चांगल्या गोष्टी समजून घेऊ शकता. जबाबदारीकडे लक्ष द्या. कामात घाई करु नका, अन्यथा नुकसानीची शक्यता आहे.
धनू - वैवाहिक जीवन चांगलं राहील. नको त्या कामात वेळ वाया जाऊ शकतो. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळेल. मन प्रसन्न राहील.
मकर - मनात अनेक विचार सुरु असल्याने कामात मन लागणार नाही. काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो. रखडलेली कामं पूर्ण करण्याकडे लक्ष द्या.
कुंभ - काही कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. मेहनत अधिक करावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. विचारपूर्वक निर्णय घ्या. एकटेपणापासून दूर राहा.
मीन - समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र डोकं शांत ठेवून त्यावर विचार करा. सकारात्मक राहा. कामात व्यस्त राहाल. तब्येतीची काळजी घ्या. आराम करा.