आजचे राशीभविष्य | ११ डिसेंबर २०१९ | बुधवार

कसा असेल तुमचा आजचा दिवस ?

Updated: Dec 11, 2019, 08:13 AM IST
आजचे राशीभविष्य | ११ डिसेंबर २०१९ | बुधवार

मेष - महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. संपत्ती, खरेदी, गुंतवणूकीसाठी दिवस चांगला आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. दररोजची कामं वेळेत पूर्ण करता येतील.

वृषभ - व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. परंतु पैसे जपून खर्च करा. कामात सहकाऱ्यांची मदत होईल. निर्णय घेताना विचार करुनच पुढे जा.

मिथुन - पैशांच्या बाबतीत चिंता राहील. वायफळ खर्च होऊ शकतो. तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. इतरांशी बोलताना सावधता बाळगा. विश्वासातील व्यक्तीकडेच तुमच्या मनातील गोष्ट शेअर करा.

कर्क - कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. घरात पैशांची स्थिती चांगली राहील. कामात मन लागेल. व्यस्त राहाल. बोलताना जिभेवर ताबा ठेवा. तब्येत चांगली राहील.

सिंह - जुन्या गोष्टी डोकं वर काढू शकतात. मनात अनेक विचार सुरु राहतील. आर्थिक चिंता राहील. इतर कामांमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करा.

कन्या - नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी दिवस चांगला आहे. आत्मविश्वास राहील. परंतु तब्येतीची काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. 

तुळ - मन प्रसन्न राहील. रखडलेल्या कामांवर पुन्हा योजना आखू शकतात. व्यस्त राहाल. जोडीदाराचा सल्ला फायद्याचा ठरेल. जोडीदारासोबत मनातील गोष्टी शेअर करा. 

वृश्चिक - कुटुंबाकडे लक्ष द्या. अनेक गोष्टींचा विचार करु नका. सावध राहा. दिवस सामान्य आहे. 

धनु - नोकरी, व्यवसायातील स्थिती सामान्य राहील. परंतु चिंता करु नका. ताण घेऊ नका. महत्त्वाच्या कामात यश मिळण्यास काही वेळ लागू शकतो.

मकर - नोकरीत तुमचं कौशल्य फायद्याचं ठरेल. अधिकारी तुमच्यावर खुश होऊ शकतात. धैर्य ठेवा. कामाचं कौतुक होतील. पैशांबाबतीत स्थिती सामान्य राहील.

कुंभ - वाद उद्भवू शकतात. मानसिक ताण वाटेल. वाहन सांभाळून चालवा. घरातील जबाबदारीकडे लक्ष द्या. 

मीन - सकारात्मक राहा. तुमच्या कामावर लक्षकेंद्रीत करा. स्वत:वर विश्वास ठेवा. आराम करा. तब्येतीकडे लक्ष द्या.