आजचे राशिभविष्य | सोमवार | ३० सप्टेंबर २०१९

कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Sep 30, 2019, 10:38 AM IST
आजचे राशिभविष्य | सोमवार | ३० सप्टेंबर २०१९ title=

मेष - मन प्रसन्न राहील. व्यवसायात लाभ होईल. नवीन अनुभव येऊ शकतात. समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची मतं स्पष्टपणे मांडा. कामातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल. 

वृषभ - दिवस चांगला आहे. पैशांच्या बाबतीत लक्ष द्यावे लागेल. नवीन गोष्टींची माहिती मिळेल. नवीन कामासाठी मित्र, भावंडांची मदत होऊ शकते. 

मिथुन - कौटुंबिक समस्यांमध्ये लक्ष द्यावे लागेल. स्वत:वर विश्वास ठेवा. पैशांच्या बाबतीत चांगल्या संधी मिळू शकतात. जमीन खरेदी-विक्रीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क - तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. धीर ठेवा. कामासंबंधी तुमचे विचार इतरांना पटवून देऊ शकाल. जबाबदारीकडे पूर्ण लक्ष द्या. जवळच्या व्यक्तींशी संबंध अधिक चांगले होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यवसायात फायद्याची शक्यता आहे.

सिंह - व्यस्त राहाल. महत्त्वपूर्ण कामांमध्ये यश मिळू शकते. पैसा मिळवण्याच्या इतर संधी उपलब्ध होऊ शकतात. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. 

कन्या - दिवस चांगला आहे. पैशांसंबंधी समस्या संपू शकतात. एखाद्या खास व्यक्तीचा सल्ला महत्त्वाचा ठरु शकतो. सक्रीय राहाल. कामं वेळेत पूर्ण होऊ शकतात. 

तुळ - नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. या भेटीचा फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. 

वृश्चिक - नवीन गोष्टींबाबत माहिती मिळू शकते. तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नांसाठी उत्तर असू शकते. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडू शकतो. 

धनु - आत्मविश्वास राहील. एखाद्या खास कामासाठी योग्य वेळेत उपस्थित राहिल्यास फायदा होऊ शकतो. नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. 

मकर - तब्येतीकडे लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा. खासगी प्रश्न सोडवण्यात यश मिळू शकते. नवीन लोकांच्या ओळखीतून फायदा होऊ शकतो.

कुंभ - नवीन लोकांशी भेट होऊ शकते. प्रवास करावा लागू शकतो. मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. आधी  केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. 

मीन - व्यवसायात लोक तुमच्या मतांशी सहमत असू शकतात. आत्मविश्वास वाढेल. खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. नोकरी, व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरु शकतात.