मेष - अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबिक संबंध सुधारतील. तुमची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. विचार करत असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक बाबींकडे लक्ष द्या. वैवाहिक सुख मिळेल. प्रेम वाढेल.
वृषभ - कामात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. मेहनतीने धन वाढण्याची शक्यता आहे. राहिलेली कामं पूर्ण करा. दिवस चांगला आहे. प्रवासाचा योग आहे. पुढे जाण्यासाठी काही बदल करणं फायद्याचं ठरु शकतं.
मिथुन - कोणतंही कामं घाईत करु नका. पैशांबाबतीत चिंता राहील. वायफळ खर्च होऊ शकतो. पैशांसंबंधी सावध राहा. तब्येतीबाबत हलगर्जीपणा करु नका. पोटाचा त्रास होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.
कर्क - नोकरीत समस्या जाणवू शकतात. हट्टीपणामुळे वाद होण्याची शक्यता आहे. अधिक विचार करु नका. अचानक एखादी समस्या उद्धभू शकते. व्यस्त राहाल. झोप पूर्ण न झाल्याने डोकेदुखी आणि डोळ्यांची जळजळ जाणवू शकते.
सिंह - कुटुंबात सुख-शांती राहील. कामाच्या ठिकाणी नवीन डील होऊ शकते. सामाजिक कामात सन्मान वाढेल. अचानक मित्रांची भेट होऊ शकते. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. जोडीदाराकडून आर्थिक मदत होऊ शकते.
कन्या - व्यवसाय वाढू शकतो. खास लोकांशी भेट होऊ शकते. समस्या संपू शकतात. अर्धवट कामं पूर्ण करा. मोठ्यांचे सहकार्य मिळेल. थकवा जाणवू शकतो. आराम करा अन्यथा तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात.
तुळ - नोकरी, व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. विशेष लाभ आणि प्रगतीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. यश मिळेल. स्वत:च्या फायद्याचा विचार करा. इतरांना नाराज न करता काम करा. जोडीदारावर रागवू नका. खर्च होऊ शकतो.
वृश्चिक - व्यवसायात फायदा कमी होण्याची शक्यता आहे. बदलीची शक्यता आहे. कोणत्याही नव्या कामाची शक्यतो सुरुवात करु नका. प्रेमसंबंधांमध्ये तणाव वाढू शकतो.
धनु - दररोजची कामं पूर्ण होतील. विचार करुन मगच निर्णय घ्या. पैशांची स्थिती चांगली राहील. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. तब्येतीत चढ-उतार राहील. जेवणात मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळा.
मकर - आज कोणताही सौदा न केल्यास चांगले राहील. वायफळ खर्च होऊ शकतो. तुमच्या योजना गुप्त ठेवा. कोणाशीही शेअर करु नका. कामात सुस्ती जाणवेल. पोटदुखी, डोकेदुखी जाणवू शकते. जेवण वेळेत करा.
कुंभ - आर्थिक तंगी संपण्याची शक्यता आहे. उत्पन्न, खर्चाचा समतोल राहील. नोकरीत अधिकाऱ्यांची मदत मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. खुश राहाल.
मीन - व्यवसायात काही बदल करायचे असल्यास पुन्हा विचार करा. महागड्या वस्तूंची खरेदी होऊ शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. सावध राहा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. थकवा जाणवू शकतो.