आजचे राशीभविष्य | १३ डिसेंबर २०१९ | शुक्रवार

कसा असेल तुमचा आजचा दिवस ?

Updated: Dec 13, 2019, 07:59 AM IST
आजचे राशीभविष्य | १३ डिसेंबर २०१९ | शुक्रवार

मेष - हवामान बदलामुळे  शारीरिकदृष्ट्या कमजोर वाटण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या. कामं वेळेत पूर्ण होतील. त्यामुळे ताण कमी राहील. जेवण वेळेत करा. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

वृषभ - ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढू शकतो. काही लोक तुमच्याकडून काम करुन घेण्याचा प्रयत्न करतील. अधिक विचार करु नका. जोडीदारापासून काही लपवू नका. 

मिथुन - चांगल्या लोकांच्या सान्निध्यात राहाल. कामाच्या ठिकाणी ताण घेऊ नका. मन शांत ठेऊन काम करा. बोलताना विचार करुनच बोला. सकारात्मक राहा.

कर्क - वाहन चालवताना काळजी घ्या. सावध राहा. मन प्रसन्न राहील. इतरांशी बोलताना सौम्यपणे बोला. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. संधीचा योग्य उपयोग करा.

सिंह - पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. जेवण करताना सावध राहा. मसालेदार पदार्थ टाळा. जोडीदाराची मदत मिळेल. विवाहप्रस्ताव येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कन्या - कोणताही निर्णय घेताना विचार करुनच पुढे जा. घाई करु नका. तब्येतीत सुधारणा होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. अधिक विचार करु ताण घेऊ नका. सकारात्मक राहा.

तुळ - दिवस चांगला जाईल. मित्रांसोबत वेळ घालवाल. नवीन काही करण्याचा प्रयत्न करु शकता. जीवनात चांगले बदल होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीबाबत विचार करु शकता. 

धनु - नोकरी, व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीत कामाकडे लक्ष द्या. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. तब्येत चांगली राहील.

मकर - नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. जुन्या समस्यांवर मार्ग निघू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. 

कुंभ - विचार करत असलेली कामं पूर्ण करु शकता. व्यस्त राहाल. कामाचा ताण वाढलेला असू शकतो. मन विचलित होण्याची शक्यता आहे. 

मीन - कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. विश्वासू लोकांचा सल्ला फायद्याचा ठरेल. चांगली बातमी मिळू शकते. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील.