Mangal Gochar 2023: 10 मे रोजी कर्क राशीत मंगळ ग्रहाचं गोचर होणार आहे. मंगळ हा धैर्य आणि क्रोधाचा कारक मानला जातो. कर्क राशीमध्ये मंगळ ग्रह 1 जुलै 2023 पर्यंत राहणार आहे. मंगळापासून शनिपर्यंत षडाष्टक योग तयार होणार आहे. इतंकच नाही तर मंगळ ग्रहाच्या या भ्रमणामुळे अनेक प्रतिकूल परिस्थिती निर्माण होतील. कुंडलीमध्ये मंगळ उच्च स्थानावर असल्यामुळे काहींना यश मिळू शकणार आहे. जाणून घेऊया मंगळाच्या या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
मंगळ गोचर हे ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचं मानलं जातं. कर्क राशीत मंगळाच्या परिवर्तनामुळे काही राशीच्या लोकांनी मनाचं संतुलन राखणं आवश्यक असणर आहे. मुळात मंगळ गोचरचा हा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर पडणार आहे. तर मग जाणून घेऊया मंगळाच्या या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
मेष रास
मंगळ गोचरमुळे या राशींच्या व्यक्तींच्या मनातील मोठ्या इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. यावेळी मेष राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम दिसू शकणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची स्थिती सुधारू शकते. तसंच वैवाहिक आयुष्यात काही समस्या असतील तर त्या दूर होणार आहे. कुटुंबातील तसंच जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध सुधारणार आहे. मात्र यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे भविष्यासाठी काही पैसे वाचवून ठेवा.
सिंह रास
कर्क राशीत मंगळाच्या परिवर्तनामुळे या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात जो काही ताण असेल तो कमी होण्यास मदत होणार आहे. खास करून विद्यार्थ्यांची परदेशात शिकायला जाण्याची इच्छा पूर्ण होईल. वैवाहिक संबंधांमध्ये असणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामातून तुमची सुटका होऊ शकते. कारण कोर्टातील निर्णयतुमच्या हिताचा असू शकतो.
कन्या रास
मंगळ गोचरचा या राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळणार आहे. तुम्ही आर्थिक गोष्टींचा विचार केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. वैवाहिक आयुष्यामध्ये समजुतीने सर्व गोष्टी ठीक होणार आहेत. तुम्ही नियोजन केल्यानुसार तुम्ही पैशांची बचत करू शकणार आहात.
तूळ रास
या राशीच्या व्यक्तींना मंगळ गोचरमुळे स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळू शकणार आहे. या काळात नोकरीच्या ठिकाणी इतर लोकं तुमच्या कामाचं कौतुक करतील. इतकंच नाही तर तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याची चिन्ह आहेत. कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात देखील तुम्हाला यश मिळणार आहे.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)