Durga Pooja 2023 : दुर्गादेवीची मूर्ती बनवण्यासाठी का वापरली जाते वेश्यालयाची माती? अद्भुत आहे कारण

Navratri Brothel Soil : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी गंगेची माती, गोमूत्र, शेण आणि वेश्यालयाच्या मातीचं महत्त्व असतं. पण काय आहे यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

नेहा चौधरी | Updated: Oct 9, 2023, 05:53 PM IST
Durga Pooja 2023 : दुर्गादेवीची मूर्ती बनवण्यासाठी का वापरली जाते वेश्यालयाची माती? अद्भुत आहे कारण
navratri 2023 why is durgas idol made from brothel mud

Navratri Brothel Soil : सूर्यग्रहणानंतर 15 ऑक्टोबर 2023 ला संपूर्ण देशात शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात देवी मातेच्या नऊ रुपाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. महाराष्ट्रासोबतच उत्तर भारत आणि ईशान्य भागात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. (navratri 2023  why is durgas idol made from brothel mud)

Add Zee News as a Preferred Source

दुर्गा पूजा पश्चिम बंगालमध्ये, विशेषतः कोलकातामध्ये मोठ्या थाटामाटात साजरी केला जातो.  बंगाली समुदायात दुर्गापूजा म्हणजे त्यांच्यासाठी दिवाळीचा सण असतो. तुम्हाला शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांचा देवदास सिनेमा आठवडतो का? त्यात दुर्गा मातेची मूर्ती बनवण्यासाठी माती आणण्यासाठी ऐश्वर्या राय ही माधुरी दीक्षितकडे जाते. काय आहे यामागील परंपरा? दुर्गा देवीची मूर्ती (Durga Murti) बनवण्यासाठी गंगेची माती, गोमूत्र, शेण याला अतिशय महत्त्व आहे. पण वेश्यालयातील (soil of Red light area) मातीशिवाय ही मूर्ती अपूर्ण मानली जाते. पण काय आहे यामागील कारण याबद्दल आपण जाणून घेऊयात. 

काय आहे यामागील परंपरा?

पारंपारिक श्रद्धेनुसार, 'पुण्यमती' किंवा पवित्र माती म्हणून ओळखल्या जाणार्‍या, सेक्स वर्करच्या हातून भिक्षा मागून ही माती भेट आणि आशीर्वाद म्हणून प्राप्त केली जाते. या मातीतून दुर्गा मातेची मूर्ती बनवली जाते. या मागे असं समज आहे की, जे लोक मग तो पुरुष असो किंवा महिला वेश्यांच्या निषिद्ध गल्लीत प्रवेश करतो तो आपले पुण्य आणि धार्मिकता दारात सोडून देहिक इच्छा आणि पापाच्या जगात प्रवेश करतो. त्यामुळे ही माती सर्व गुण आत्मसात करून धन्य होते. म्हणून वेश्यागृहाच्या दरातील माती पवित्र मानली जाते. 

दुसरी कथा अशी आहे की, एक वेश्या माता दुर्गेची निस्सीम भक्त होती. पण तिचा समाजाकडून तिरस्कार होत होता. अशात एका ऋषींच्या स्वप्नात देवी प्रगट झाली. त्या देवीने ऋषीला स्वप्नात आदेश दिले वेश्यालयातील मातीचा वापर करुन देवीची मूर्ती बनव. अशाप्रकारे दुर्गा मातेने त्या वेश्याची भक्ती स्वीकार. तेव्हा पासून मूर्ती बनवण्यासाठी वेश्यालयातील मातीचा वापर केला जातो. 

हेसुद्धा वाचा - Navratri 2023 : शारदीय नवरात्र कधी आहे? मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video

तर लोकांच्या मते वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे वाईट नजरने पाहिलं जातं. या काळा समाजातील महिलांना वाळीत टाकलं जातं. या अंधारात महिला इच्छेने गेलेला नसतात. काही समाज कंटकांकडून त्या तिथे फेकल्या गेलेल्या असतात. अशावेळी दुर्गा पूजा निमित्ताने त्यांनाही समाजातील एक भाग म्हणून वावरता यावं असाही त्या मागील एक उद्देश आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More