Pitru Paksha 2023 : पूर्वजाचं देहावसान कोणत्या तिथीला झालं माहित नाहीये? 'या' 3 दिवशी करा श्राद्ध विधी

Pitru Paksha 2023 Date and Tithi : धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षात पितरांना पिंड दान, श्राद्ध आणि तर्पण केलं जातं. या दिवसांत केलेला विधी हा पूर्वजांपर्यंत पोहोचतो अशी श्रद्धा आहे. 

नेहा चौधरी | Updated: Sep 26, 2023, 03:43 PM IST
Pitru Paksha 2023 : पूर्वजाचं देहावसान कोणत्या तिथीला झालं माहित नाहीये? 'या' 3 दिवशी करा श्राद्ध विधी title=
pitru paksha 2023 starting from september 29 important shradh dates shraddha tithi vidhi sarvapitru amavasya

Pitru Paksha 2023 Date and Tithi : गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृ पक्ष पंधरवड्याला सुरुवात होते. यंदा पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 ला पासून 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. या पंधरा दिवसांमध्ये पितंराना प्रसन्न करण्यासाठी पिंड दान, श्राद्ध आणि तर्पण हे विधी केले जातात. यंदा श्राद्ध पक्षात तीन विशेष तिथींला महत्त्व आहे. या तिथीला श्राद्ध केल्यास पितरांपर्यंत ते पोहोचले, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. (pitru paksha 2023 starting from september 29 important shradh dates shraddha tithi vidhi sarvapitru amavasya)

हिंदू धर्मात तिथीला महत्त्व आहे, त्यासाठी दररोजचं पंचांग पाहिलं जातं. तसंच श्राद्ध पक्षातील प्रत्येक तिथीचं आपलं असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक तिथीला कोणता ना कोणता पूर्वज आपल्याला सोडून गेलेले असतात. त्यामुळे या तिथीलाच आपल्या पूर्वजनांना श्राद्ध केलं जातं. पण तुम्हाला जर पूर्वजाच्याची मरण तिथी माहिती नसेल किंवा घरात काही लोक वेगवेगळ्या तिथीला देहावसान झाले असतात, अशावेळी कुठल्या तिथीला श्राद्ध करता येईल हे जाणून घ्या. 

'या' 3 दिवशी करा श्राद्ध विधी

भरणी श्राद्ध

हिंदू पंचांगानुसार, भरणी श्राद्ध 2 ऑक्टोबर 2023 ला असणार आहे.  या दिवशी भरणी नक्षत्र संध्याकाळी 06:24 पर्यंत असणार आहे. धार्मिक मान्यतांनुसार भरणी श्राद्ध मृत्यूनंतर एक वर्षांनी करायचं असतं. लग्नापूर्वी मृत्युमुखी पडणाऱ्यांचे श्राद्ध पंचमी तिथीला केलं जातं, जर भरणी नक्षत्र पंचमी तिथीला आले तर हे दुर्मिळ आणि विशेष असतं. 

नवमी श्राद्ध

हिंदू पंचांगानुसार नवमी श्राद्ध 7 ऑक्टोबरला असणार आहे. नवमी श्राद्धाला मातृ श्राद्ध किंवा मातृ नवमी असंही म्हटलं जातं. या तिथीला घरातील आई, आजी, आजी यांचं श्राद्ध केलं जातं. मातृ नवमीच्या दिवशी आपल्या आई-वडिलांना तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान करुन प्रसन्न केलं जातं. 

सर्वपित्री अमावस्या

पंचांगानुसार 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे. या तिथीला ज्या पितरांच्या तारखा माहित नाहीत त्यांचं श्राद्ध केलं जातं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंड दान करता येतं. 

हेसुद्धा वाचा - Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात मुलगी पिंडदान करु शकते का? जाणून घ्या नियम आणि विधी

श्राद्ध तिथी 2023

29 सप्टेंबर 2023 - शुक्रवार, पौर्णिमा श्राद्ध किंवा प्रतिपदा श्राद्ध
30 सप्टेंबर 2023 - शनिवार, द्वितीया श्राद्ध
01 ऑक्टोबर 2023 - रविवार, तृतीया श्राद्ध किंवा भरणी श्राद्ध
02 ऑक्टोबर 2023 - सोमवार, चतुर्थी श्राद्ध
03 ऑक्टोबर 2023 - मंगळवार, पंचमी श्राद्ध
04 ऑक्टोबर 2023 -  बुधवार, षष्ठी श्राद्ध
05 ऑक्टोबर 2023 -  गुरुवार, सप्तमी श्राद्ध
06 ऑक्टोबर 2023 - शुक्रवार, अष्टमी श्राद्ध
07 ऑक्टोबर 2023-  शनिवार, नवमी श्राद्ध
08 ऑक्टोबर 2023 - रविवार, दशमी श्राद्ध
09 ऑक्टोबर 2023 - सोमवार, एकादशी श्राद्ध
10 ऑक्टोबर 2023 - मंगळवार, मघा श्राद्ध
11 ऑक्टोबर 2023 - बुधवार, द्वादशी श्राद्ध
12 ऑक्टोबर 2023 - गुरुवार, त्रयोदशी श्राद्ध
13 ऑक्टोबर 2023-  शुक्रवार, चतुर्दशी श्राद्ध किंवा शस्त्राहदिहत् पितृ श्राद्ध
14 ऑक्टोबर 2023, शनिवार, सर्वपित्री अमावस्या किंवा अमावास्या श्राद्ध

हेसुद्धा वाचा - Bhadrapad Purnima 2023 : भाद्रपद पौर्णिमेला 5 दुर्मिळ योग! धनलाभासाठी करा 'हे' उपाय

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)