Rahu Gochar 2024 : 'या' राशींवर राहूचा प्रकोप! 2024 मध्ये राहा सावध, आनंदाला लागणार ग्रहण

Rahu Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष 2024 मध्ये राहू मीन राशीत असणार आहे. राहूचा नकारात्मक प्रभाव हा काही राशींवर पडणार आहे. काही राशीच्या लोकांच्या आनंदाला ग्रहण लागणार असून त्यांनी लोकांनी सावध राहावं.  

नेहा चौधरी | Updated: Jan 31, 2024, 08:15 AM IST
Rahu Gochar 2024 : 'या' राशींवर राहूचा प्रकोप! 2024 मध्ये राहा सावध, आनंदाला लागणार ग्रहण title=
Rahu Gochar 2024 Rahu wrath on these zodiac signs Be careful in 2024 happiness will be eclipsed

Rahu Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील पापी आणि क्रूर ग्रह राहू हा 2024 आणि 2025 मध्ये मीन राशीत असणार आहे. केतूप्रमाणेच राहू हा सावलीचा ग्रह मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहूची महादशा 18 वर्षांपर्य्ंत असते. अशा स्थितीत राहु जर कुंडलीत शुभ स्थानावर स्थित असेल तर ते व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळतात. पण हाच ग्रह अशुभ स्थानी असेल तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मीन राशीतील राहूचे संक्रमण काही राशींसाठी अडचणी निर्माण करणारा ठरणार आहे. या राशीच्या लोकांनी 2024 मध्ये अत्यंत सावध आणि सतर्क राहणे गरजेच आहे. चला जाणून घेऊया 2024 मध्ये राहुमुळे कोणत्या राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac)   

वर्ष 2024 मध्ये कन्या राशीच्या लोकांनी अत्यंत सावधगिरीने राहवं लागणार आहे. राहु तुमच्या राशीतून सप्तम भावात प्रवेश करणार असल्याने तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसंच, तुम्ही तुमचं काम अत्यंत सावधगिरीने करणे गरजेच आहे. अन्यथा तुमच्या कामात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे येण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना लव्ह लाइफ आणि वैवाहिक जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागणार आहे. ज्यामुळे तुम्ही चिंतित होणार आहे. 

धनु रास (Sagittarius Zodiac) 

राहू तुमच्या राशीतून चौथ्या भावात प्रवेश असल्यामुळे धनु राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी करावी लागणार आहे. तसंच, 2024 मध्ये तुमच्या सुखसोयी कमी होण्याची दाट शक्यता आहे. तुमचे खर्चही उत्पन्नापेक्षा वाढणार आहे. ज्यामुळे तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कौटुंबिक जीवनात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा नात्यात दुरावा येण्याची दाट शक्यता आहे. त्याच वेळी, मालमत्तेबाबत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

राहू तुमच्या राशीपासून दुसऱ्या घरात असल्यामुळे तुम्हाला 2024 मध्ये अनेक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. तुमच्या खर्चात अचानक वाढ होणार आहे. जे तुम्हाला हाताळणे कठीण होणार आहे. तसंच, 2024 मध्ये, तुम्हाला प्रवास करताना काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरदार लोकांनी आपलं काम काळजीपूर्वक करावं. त्याशिवाय अधिकारी आणि सहकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारच्या वाद करु नका. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पैशांचा व्यवहार करु नका.

मीन रास (Pisces Zodiac)  

2024 मध्ये राहू तुमच्या राशीत असल्यामुळे या लोकांनी आपलं काम विचारपूर्वक करावं. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणं तुमच्या हिताच ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचे तुमचे संबंध बिघडू शकतात. रागामुळे केलेले काम बिघडण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यापाऱ्यांना नुकसान होणार आहे. ज्यामुळे त्यांची चिंता आणि मानसिक तणाव वाढणार आहे. तुमच्या जीवनातील अति अहंकारामुळे तुमच्या आजूबाजूचे वातावरण नकारात्मक असणार आहे. नोकरीत असलेल्या लोकांनी 2024 मध्ये सावधगिरीने काम करावं लागणार आहे नाही तर नोकरी जाण्याची शक्यता आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)