Shani Situation 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. कुंडलीतील कुठल्या घरात कुठला ग्रह आहे यावर जाचकाचं भवितव्य अवलंबून असतं. या 9 ग्रहांमध्ये शनि हा अतिशय महत्त्वाचा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात शनी देव हा न्यायचा कारक मानला जातो. ज्याचे कर्म चांगले त्याला शुभ परिणाम मिळतात. तर चुकीची कर्म करणाऱ्याला शनिदेव शिक्षा देतो. त्यामुळे शनिची स्थिती महत्त्वपूर्ण आहे. शनी एका राशीत अडीच वर्ष विराजमान राहत असून सध्या तो कुंभ राशीत आहे. कुंभ राशीतील शनिची डिग्रीत त्याची खरी अवस्था ठरवतात.
ज्योतिषशास्त्रानुसार जो ग्रह 1 ते 10 डिग्रित असून तो विषम राशीत असतो तो जागृत अवस्थेत असतो असं म्हटलं जातं. हे गणित पाहता शनिदेव कुंभ राशीत 15 ऑगस्टपासून जागृत अवस्थेत आहे. शनिची जागृत अवस्था ही चार राशींसाठी अचानक बंपर धनलाभ घेऊन आला आहे. (shani jagrut in kumbh rashi these lucky rashi to get money)
मिथुन राशीचा स्वामी हा बुध असून बुध आणि शनि हे एकमेकांचे मित्र मानले जातात. त्यामुळे मिथुन राशींसाठी शनि जागृत अवस्था भाग्यशाली सिद्ध होणार आहे. या काळात त्यांना नशिबाची साथ मिळणार आहे. मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामानिमित्त बाहेर गावी जावं लागू शकतं. परदेशात जाण्याचा योग या राशींचा नशिबात आहे.
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून हा देखील शनिदेवाचा मित्र आहे असं म्हणतात. त्यामुळे या राशीच्या कुंडलीत शश आणि केंद्र त्रिकोण राजयोग जुळून आला आहे. या काळात तुम्हाला अनेक मदतीचे हात पुढे येणार आहेत. तुमची कामं सहज पूर्णत्वाला येणार आहे. नशिबाची साथ काय असते त्याचा अनुभव तुम्हाला येणार आहे.
शनिची जागृत अवस्था या राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. या राशींना सकारात्म परिणाम दिसून येणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगली बातमी मिळणार आहे. नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. भौतिक सुखाच्या वस्तू खरेदीचे योग आहेत.
या राशीच्या गोचर कुंडलीत केंद्र त्रिकोण योग निर्माण होत आहे. तर या राशीच्या पंचम स्थानात शनि असल्याने या लोकांना अधिक लाभ होणार आहे. मालमत्ता आणि कार खरेदीचे योग तुमच्या कुंडलीत तयार होत आहे. कार्यक्षेत्रात आणि समाजात मानसन्मान वाढणार आहे. मात्र या लोकांनी बोलण्यावर संयम ठेवायला पाहिजे.