तळहातावर असलेल्या शनि पर्वतावरील खुणा सांगतात की, तुम्ही किती श्रीमंत व्हाल! असे तपासा

शनि पर्वताची स्थिती आणि हातातील शनि रेषा व्यक्तीचे आयुष्य, आर्थिक स्थिती, करिअर कसे असेल याबाबत सांगते.

Updated: Jul 17, 2022, 06:24 PM IST
तळहातावर असलेल्या शनि पर्वतावरील खुणा सांगतात की, तुम्ही किती श्रीमंत व्हाल! असे तपासा title=

Shani Parvat In Palm: ज्योतिष शास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे हस्तरेषाशास्त्रातही शनि पर्वत आणि तळहातावरील शनि रेषेला खूप महत्त्व दिले गेले आहे. शनि पर्वताची स्थिती आणि हातातील शनि रेषा व्यक्तीचे आयुष्य, आर्थिक स्थिती, करिअर कसे असेल हे सांगते. ही रेषा आयुष्यात खूप संघर्ष करावा लागेल किंवा त्याला उच्च पद मिळेल, याबाबत सांगते. तळहातावर शनि शुभ असेल तर त्या व्यक्तीला खूप मान-सन्मान मिळतो. याशिवाय शनि पर्वतावर असलेल्या खुणा भविष्याबाबत महत्त्वाचे संकेत देतात.

शनि पर्वतावरील खुणांचा अर्थ

-शनि पर्वत तळहाताच्या मधल्या बोटाखाली म्हणजेच सर्वात मोठ्या बोटाखाली स्थित असते. जर शनि पर्वत चांगला विकसित झाला असेल, म्हणजेच उंचावलेला असेल तर अशी व्यक्ती खूप भाग्यवान असते. असे लोक मेहनतीही असतात आणि भाग्यवानही असतात. असे लोक जीवनात उच्च स्थान प्राप्त करतात.

-जर शनि पर्वत अत्यंत विकसित असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात अपार संपत्ती, वैभव आणि कीर्ती प्राप्त होते. अशी व्यक्ती आयुष्यात सर्व काही मिळवते. पण त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता असते. अशा लोकांना त्यांच्या कामामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही.

-शनि पर्वतावर क्रॉस किंवा बेटाचे चिन्ह असल्यास अशा व्यक्तीला जीवनात त्रास होतो. असे लोक वंचित जीवन जगतात. खूप मेहनत करून एखादी गोष्ट साध्य केली तरी आयुष्यात चढ-उतारांचा सामना करावा लागतो.

-ज्या लोकांच्या हातात शनिची शुभ स्थिती नसते, अशा व्यक्तींनी शनिच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय करावेत. यासाठी त्यांनी शनिवारी शनि मंत्राचा जप करावा, शनिशी संबंधित वस्तूंचे दान करावे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)