४ फेब्रुवारी : 'या' व्यक्तींचे नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता

आजचा दिवस कसा असेल    

Updated: Feb 4, 2020, 08:48 AM IST
४ फेब्रुवारी : 'या' व्यक्तींचे नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता title=

मेष - तुम्ही कोणत्या तरी निर्णयाची प्रतिक्षा कराल. ऑफिसमधल्या कामा शिवाय कोणतं नवीन काम हाती घेतलं तर यश मिळण्याची शक्यता आहे. मोहनतीचं फळ चांगलं मिळेल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. 

वृषभ - परिवारामध्ये सुखशांती वाढेल. कार्यक्षेत्रात नवे करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. कोणत्या चांगल्या मित्राशी ओळख होण्याचे योग आहेत. तुमचे लक्ष कोणत्या दुसऱ्या स्थानी जास्त असेल. ऑफिसमध्ये कोणती व्यक्ती गुप्त रितीने तुमची मदत करेल.

मिथुन - पूर्ण लक्ष फक्त कामावर केंद्रीत करा. नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. प्रसन्न राहाल. सर्वांसोबत प्रेमपूर्ण व्यवहार राहील. जवळपासच्या लोकांची मदत मिळू शकते. 

कर्क -  नवीन काही करण्याचा प्रयत्न कराल पण जे काम पूर्वीपासून करत आहात त्याकडे लक्ष द्या. केलेल्या कामाचा परिणाम मिळू शकतो. नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधी अनेक योजना मनात सुरु राहतील. जुन्या मित्राची भेट होण्याचा योग आहे. नवीन नोकरीची संधी आहे.

सिंह - दिवस चांगला आहे. आनंदी राहाल. काही लोकांना तुमच्याबाबत द्वेष वाटू शकतो. कोणत्याही बाबतीत हट्ट करु नका. आरोग्याची काळजी घ्या. जे मनात येईल त्या गोष्टींकडे लक्ष द्या.

कन्या - आत्मविश्वास ठेवा. कोणत्याही कामाचा ताण घेऊ नका. अडचणींची कामं पूर्ण कराल. कोणाच्याही विरोधात जाऊ नका. काही कामं इच्छेविरुद्ध करावी लागतील. साथीदाराचं सहकार्य मिळेल.  वायफळ अधिक खर्च होऊ शकतो. मानसिक ताण राहील. अधिक विचार न करणं योग्य ठरेल.

तुळ - कामासाठी प्रवास होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. आज काही कामांच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. सावध राहा. नोकरी- व्यापाराच्या दृष्टीने दिवस आव्हानात्मक असेल. स्वत:वर जास्त लक्ष द्या. 

वृश्चिक - ठरवलेली सगळी जुनी कामं आज पूर्ण होतील. आजचा दिवस खूप खास असेल. सामुहिक आणि सामाजिक कामात आज सहभाग घ्या. यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबाकडून प्रेम मिळेल. आरोग्य सुधारेल. तुमची स्थिती जाहीरपणे बोलवून दाखवू नका.

धनु  - आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. अशा काही गोष्टी समोर येतील ज्या आगामी काळात महत्वाच्या ठरणार आहेत. समजूतदारपणाचा वापर करा. पत्नीला वेळ द्या अन्यथा रुसव्याला सामोरं जावं लागेल. आरोग्य थोडं त्रासदायक असेल. 

मकर - आज कामाशी संबंधीत जबाबदारी वाढणार आहे. दिवसपूर्ण कामात जाणार आहे. व्यवसायासंबंधी अनेक निर्णय तुम्हाला अतिशय सावधपणे घ्यायला हवे. अनेक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल. प्रवास करण्याचा योग आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. 

कुंभ - कामाच्या ठिकाणी स्वत:वर नियंत्रण ठेवा. बढतीचे योग आहेत. नोकरी आणि व्यवसायासंबंधीत महत्त्वाचे निर्णय घेवू नका. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 

मीन - नोकरीमध्ये उत्तम कामगिरी राहिल. बिझनेसमध्ये फायदा होण्याचा योग आहे. वरिष्ठांकडून मदत मिळेल. मुलाखत देण्याचा विचार असेल तर यश मिळेल. आज मन प्रसन्न राहिल.