Surya Gochar : सूर्य देव करणार धनु राशीत प्रवेश, या 4 राशींचं भाग्य उजळणार

धनु राशीत सूर्य देवाच्या गोचरामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना चांगले दिवस येणार आहेत

Updated: Oct 28, 2022, 10:39 PM IST
Surya Gochar : सूर्य देव करणार धनु राशीत प्रवेश, या 4 राशींचं भाग्य उजळणार title=

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य प्रथम 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर एक महिन्यानंतर म्हणजेच 16 डिसेंबर 2022 रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देव करिअर, प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि अहंकार यांचं प्रतीक मानलं जातं.

16 डिसेंबर 2022 रोजी सकाळी सूर्य देव धनु राशीत प्रवेश करणार आहे. चला जाणून घेऊया धनु राशीत सूर्य देवाच्या गोचरामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना चांगले दिवस येणार आहेत.

मेष 

या राशीच्या लोकांसाठी सूर्यदेव पाचव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे परदेशात शिक्षण घेण्याची योजना असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे फायदेशीर ठरू शकते. शिवाय यामुळे नात्यात गोडवा देखील येण्याची शक्यता आहे.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्यदेव दुसऱ्या घराचा स्वामी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगली बातमी मिळू शकणार आहे. याशिवाय जर तुम्ही कोणत्या प्रकरणामध्ये अडचणीत येणार असाल तर त्यामधून तुम्ही नक्की सुटणार आहात.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य 12 व्या घराचा स्वामी आहे. यावेळी व्यावसायिक व्यक्तींना फायदा होऊ शकतो. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो.

धनु

या राशीसाठी सूर्यदेव नवव्या घराचा स्वामी आहे. सूर्य गोचर तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. कामाच्या ठिकाणीही वेळ तुमच्यासाठी अनुकूल असू शकतो. त्याचशिवाय कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळून पगारही वाढू शकतो. सरकारी धोरणांचाही तुम्हाला लाभ मिळू शकतो.