close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशिभविष्य | १९ ऑक्टोबर २०१९ | शनिवार

जाणून घ्या तुमचा दिवस आज कसा असेल?

Updated: Oct 19, 2019, 09:51 AM IST
आजचे राशिभविष्य | १९ ऑक्टोबर २०१९ | शनिवार

मेष - जर कोणता महत्वाचा निर्णय घेणार असाल तर शांत रहा, सगळं ठिक होणार आहे. ऑफिसमध्ये रोजच्या कामातून सुटका होईल. मेहनत करा भरघोस यश मिळण्याची शक्यता. मोठा फायदा होणार आजच्या दिवशी. कुटुंबासोबत वेळ घालवा. व्यावसायिकांसाठी आजचा चांगला दिवस. 

वृषभ - आपली मतं आणि बोलण्यामुळे इतरांवर प्रभाव पाडाल. ऑफिसमध्ये आपल्यापेक्षा लहान लोकांकडून त्रास होऊ शकतो. बिघडलेली काम आज सरळ होऊ शकतात. विचार करण्याच्या पद्धतीत थोडा बदल करा फायदा होईल. मित्रपरिवाराकडून आज मदत मिळेल. 

मिथुन - रोजचच काम करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. आपल्या जबाबदाऱ्या लक्षात ठेवा. आपली वेळ आणि संयम या दोघांचा चांगला मेळ घाला. शांत राहून काम करा तुम्हाला सर्वाधिक फायदा होईल. सकारात्मक राहण्याचा पूर्ण विचार करा. 

कर्क - पैसे कमावण्याच्या प्रयत्नात असाल तर यश नक्की मिळेल. जास्त कामासाठी आणि पार्ट-टाइम कामासाठी प्रयत्नशील असाल तर फायदा होईल. दुसऱ्यांची बाजू देखील समजून घ्या. चांगली गोष्ट कानावर पडेल. 

सिंह - बेरोजगार लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. बिझनेसमध्ये यश मिळेल. भावनांवर ताबा ठेवा. कोणताही मोठा निर्णय भावूक होऊन घेऊ नका. जीवनात खूप मोठा बदल आज होऊ शकतो. प्रमोशन किंवा नवीन नोकरी यासंदर्भात खुशखबर कानी पडेल. अनावश्यक खर्चांमध्ये वाढ होईल. 

कन्या - आजचा दिवस चांगला राहिल. तुमच्या भावनांवर ताबा ठेवा. ऑफिसमध्ये विचित्र लोकांसोबत जास्त बोलणं होईल. त्यांच्याकडून मदत मिळेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा. मानसिक आधाराची गरज असेल. 

तूळ - या राशीची लोकं आज परिस्थिती बदलण्याचा खूप प्रयत्न करतील. हिम्मत आणि डोकं वापरून ही परिस्थिती नक्की बदलेल. चांगला व्यवहारामुळे काही लोकांची मदत मिळेल. थांबलेली सर्व काम पूर्ण होऊ शकतात. मात्र ऑफिसमधील काम संपवण्यात अयशस्वी राहाल. 

वृश्चिक - खूप काम आज सहज पूर्ण होतील. चांगल्या कामामुळे इतरांवर प्रभाव पाडू शकाल. जी काम अडकलेली आहेत ती आज पूर्ण होतील. कामात यश मिळेल. जोडीदाराकडून मदत मिळेल, त्याचा सर्वाधिक फायदा होईल. कुटुंबासोबत आज वेळ घालवाल. पत्नीचा आदर करा. 

धनू - खूप दिवसांपासून प्लानिंग केलेली आज सर्व काम पूर्ण होणार. तसेच मनात इच्छा धरलेल्या देखील पूर्ण होतील. प्रयत्नात यशस्वी व्हाल त्यामुळे प्रयत्न करणं थाबवू नका.यातून काही तरी नवीन शिकायला मिळेल. तोंडात सतत साखर ठेवा आज गोड बोलल्यामुळे सर्व काम पूर्ण होतील. 

मकर - बेरोजगारांना आज नोकरी मिळेल. अशा गोष्टी टाळा ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तसेच काम पूर्ण करण्यासाठी इतरांची मदत घ्याल. कोणताही मोठा निर्णय घेण्याअगोदर पूर्णपणे विचार करा. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. 

कुंभ - आजचा दिवस सामान्य असे. त्रासापासून स्वतःला खऱ्या अर्थाने सांभाळा. ऑफिसमध्ये विचित्र लोकांशी वाद होऊ शकतो. त्रासाने भरलेल्या दिवसामध्ये काही लोकांकडून मदत देखील मिळे. दिवसाच्या अखेरीस चांगली गोष्ट कानी पडेल. 

मीन - रोजची किंवा पार्टनरशीपमध्ये काम करत असल्यास फायदा होईल. मित्रपरिवाराकडून मदत मिळेल. कोणत्याही प्रकारचा गोंधळ असेल तर तो दूर होईल. पैसे आणि इतर गोष्टीत आज लाभ होईल. मानसिकरित्या कठोर रहा.