राशीभविष्य | २१ नोव्हेंबर २०१९ | गुरूवार

असा असेल आजचा दिवस 

Updated: Nov 21, 2019, 08:16 AM IST
राशीभविष्य | २१ नोव्हेंबर २०१९ | गुरूवार

मेष - आज तुम्हाला तुमचं महत्व लक्षात येईल. दररोजची काम वेळेत संपवण्याचा प्रयत्न कराल. जबाबदाऱ्यांचा दिवस असून एकामागून एक काम येतच राहतील. राजकारणाशी संबंधीत असलेल्या लोकांना आज मोठा निर्णय घ्यावा लागेल. नोकरी आणि कामात मोठा फायदा होईल. 

वृषभ - भावनांचा चढ-उतार आज पाहायला मिळेल. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करून नका. सहकार्यांची मदत लाभेल. राजकारणात असलेल्या व्यक्तीने आज शांत राहून निर्णय घ्यावा. घाईत कोणताही निर्णय घेऊ नये. 

मिथुन - पैशांमुळे आज तुमचं कोणतंच काम थांबणार नाही. अचानक धन लाभ होऊ शकतो. लोकांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे लक्षात आल्यामुळे अनेक गोष्टी खूप सोप्या होतील. राजकीय संबंध असलेल्या नेत्यांनी आज महत्वाचा निर्णय घ्यावा. निर्णयात सहयोगी कर्मचाऱ्यांचा विचार करावा. 

कर्क - धन लाभ झाल्यामुळे आज दिवस आनंदाचा असेल. अर्धवट राहिलेल्या गोष्टी आज पूर्ण होतील. आज घेतलेल्या निर्णयाचा फायदा कालांतराने जाणवेल. पण राजकीय नेत्यांनी देखील निर्णय घेण्यात आजचा फायदा पाहू नये. थंड डोक्याने विचार करा. 

सिंह - दुरावलेल्या व्यक्तींशी आज संबंध सुधारेल. आत्मविश्वासाने कोणतंही काम करा. आपली सवय जी खटकतेय ती सुधारण्याचा प्रयत्न करा. याचा सर्वाधिक फायदा तुम्हालाच होईल. राजकीय मंडळींनी आज जरा बघ्याचीच भूमिका घ्यावी. तुमच्यासाठी दिवस थोडा वेगळा आहे. शांत राहण्यातच शहाणपण आहे. 

कन्या - गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. संवेदनशील व्यक्तीने आज सगळीकडे शांतपणे बघणंच योग्य आहे. नोकरीमुळे प्रवास होईल. राजकीय मंडळींचा देखील आज प्रवास होईल. हा प्रवास थोडा दगदगीचा असेल. 

तूळ - आज एक काम तुम्ही अगदी मनावर घेऊन कराल त्यामध्ये तुम्ही अग्रस्थानी असाल. आजचा दिवस सामान्य असेल. राजकीय व्यक्तींनी आज थोडा वेळ कुटुंबाला द्यावा हे त्यांच्या राजकीय दृष्टीकोनातून महत्वाचे ठरेल. 

वृश्चिक - कमी वेळात आज मोठा निर्णय घ्याल. कार्यात सफलता निर्माण होईल. नोकरी आणि व्यवसायात आज मोठा निर्णय घ्याल. प्रॉपर्टीचा निर्णय विचारपूर्वक घ्याल. राजकीय व्यक्तीला आज भरपूर मनस्ताप होईल. शांत आणि संयमी राहणं यातच शहाणपण आहे. 

धनू - काही काम आज कुटुंबाकडून मिळणाऱ्या मदतीमधून होतील. धन लाभ होऊ शकतो त्यामुळे आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पाहा. राजकीय व्यक्तींनी महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. संभ्रमात घालणारा आजचा दिवस आहे. 

मकर - आजचा दिवस कामाचा आहे त्यामुळे जास्त वेळ काम कराल. इतर कोणतेही प्लान्स करू नका. त्याचा उपयोग होणार नाही. राजकीय व्यक्तींना आजचा दिवस आनंदाचा असेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. ठरवलेली सगळी काम पूर्ण होतील. 

कुंभ - कामामुळे आज मान-सन्मान मिळेल. यामध्ये जोडीदाराचा खूप मोठा वाटा असेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. राजकीय व्यक्तींना देखील आजचा दिवस समाधानकारक असेल. ठरवलेली सगळी काम सुरळीत पार पडतील. नवी दिशा हाती येईल. 

मीन - आज अनेक दिवसांपासून रखडलेलं काम पूर्ण कराल. याकरता इतरांची मदत होतील. स्वास्थाचा विचार करा आणि बाहेर जाण्याचा निर्णय घ्या. राजकीय व्यक्तींचे परदेश दौरे आजपासून सुरू होतील.