मेष - अचानक फायदा होईल. धनलाभाचा योग आहे. चांगल्या लोकांशी ओळख होऊ शकते. या ओळखीमुळे तुमचे विचारही बदलू शकतात. तुमच्या भावना, टेन्शन शेअर कराल. दररोजची कामं पूर्ण होतील. जोडीदाराची साथ मिळेल.
वृषभ - तुमच्या कामाबाबत गंभीरपणे विचार करा. दुसऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. नवीन लोकांच्या ओळखीने फायदा होईल. कामासाठी प्रवास होऊ शकतो. विवाहसंबंधी चर्चा होऊ शकते. सकारात्मक व्यक्तीशी बातचीत होऊ शकते.
मिथुन - मुलांची मदत मिळेल. व्यावसायात नशिबाने अधिकतर कामं पूर्ण होतील. पैसा किंवा कामाबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सकारात्मक राहाल. विचार केलेली कामं पूर्ण कराल.
कर्क - उत्साही राहाल. नवीन लोकांशी जोडले जाल. नातेसंबंधांबाबत काही गोष्टी खास ठरतील. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अचानक समोर येणाऱ्या कामांसाठी स्वत:ला तयार ठेवा.
सिंह - काही गोष्टींचा खोलवर विचार कराल. मित्रांच्या सल्ल्याने फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या मदतीने एखाद्याची समस्या सुटू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहिल.
कन्या - जीवनात काही बदल होऊ शकतात. तुमची ओळख निर्माण करु शकता. जोडीदारासोबत संबंध सुधारतील. तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.
तुळ - सुखद आणि आनंदी दिवस आहे. स्वत:मध्ये काही बदल करु शकाल. काही योजना मनात असल्यास दिवस खास आहे. करियरसाठी दिवस चांगला आहे. याबाबत केलेली बातचीत फायद्याची ठरु शकेल. पैसा कमावण्याच्या नव्या संधी मिळतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
वृश्चिक - एखाद्या गोष्टीबाबत मनात उत्सुकता राहील. चांगल्या बोलण्याने तुमचे प्रयत्न सफल होऊ शकतात. निस्वार्थी भावनेने काम कराल. सकारात्मक राहाल. स्वत:वर विश्वास ठेवा. तब्येत चांगली राहील.
धनु - मानसिक आणि शरीरिकरित्या व्यस्त राहाल. कामापासून मागे हटू नका. पैसे कमावण्याचा नवा मार्ग मिळू शकतो. मुलांच्या यशाने आनंदी व्हाल. व्यावसायात आज केलेल्या योजना पुढील काळासाठी फायदेशीर ठरु शकतात.
मकर - आज व्यावहारिक राहाल. त्यामुळे फायदा होईल. सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहाल. उत्साही राहाल. नवीन विचार मनात येतील. नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला ठरु शकतो.
कुंभ - नशिबाची साथ मिळेल. काही लोक तुम्हाला नवीन गोष्टी करण्यास प्रेरित करतील. आता केलेले प्रयत्न सफल होण्याची शक्यता आहे. नोकरीत जबाबदारीचे काम मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामात मन लागेल.
मीन - बचतीच्या बाबतीत गंभीरपणे विचार करा. दिवस चांगला आहे. भविष्यातील योजनांकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत असलेले मतभेद संपवण्याचा प्रयत्न होईल. जोडीदाराच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा. मुलांसंबंधी चांगली बातमी मिळू शकते.
- डॉ. दीपक शुक्ल