आजचे राशीभविष्य | मंगळवार | ३० जुलै २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Jul 30, 2019, 08:23 AM IST
आजचे राशीभविष्य | मंगळवार | ३० जुलै २०१९ title=

मेष- आजची एकंदर परिस्थिती पाहता कामाचे बेत आखल्यास फायद्याचं ठरेल. मित्रांची मदत मिळेल. साथीदारासोबत फिरायला जाण्याचा योग आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी विवाहप्रस्ताव मिळतील. अडकलेल्या कामांची सुरुवात होईल. व्यापार वाढेल. 

वृषभ- नशिबाची साथ मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. विचाराधीन कामंही मार्गी लावाल. अचानक अर्थार्जनात वाढ होईल. एखाद्या परिस्थितीचा गुंता सोडवण्यासाठी यशस्वी ठराल. धार्मिक स्थळांवर जाण्याचा योग आहे. 

मिथुन- मित्रांच्या साथीने काही नवी आणि सकारात्मक कामं सुरु कराल. यासाठी पहिला प्रय़त्न तुम्हीच करणं अपेक्षित आहे. साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. अविवाहितांना प्रेमाचे आणि लग्नाचे प्रस्ताव मिळतील. तुमच्या काम करण्याच्या पद्धती इतरांना प्रभावित करतील. मित्रमंडळी आणि 
भावंडांची मदत मिळेल. 

कर्क- करिअरच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल घडतील. त्याच दिशेने तुम्ही बेत आखण्यास सुरुवात कराल. परिस्थिती सुधारेल. आज तुमच्या प्रयत्नांना बऱ्याच अंशी यश मिळेल. साथीदारासोबत चांगले संबंध ठेवा. कामाचे बेत आखा. 

सिंह- आज तुम्हाला अनेक नव्या संधी मिळतील. दैनंदिन कामं सहजपणे पूर्ण होतील. करिअर किंवा सामाजिक संबंधांच्या निमित्ताने ज्या व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यावर तुमचा प्रभाव असेल. आज केलेल्या कामांमुळे बढतीही मिळू शकते. एखाद्या नव्या कामाची आखणी कराल. 

कन्या- अडचणीत अडकलेल्यांना काही अंशी उसंत मिळेल. पैसे वाचवण्यात यशस्वी ठराल. कुटुंब किंवा इतरत्र कुठेही अडचणीची परिस्थिती उदभवल्यास शांत राहा. आज बऱ्याच अंशी संतुलितपणे वागण्याचा प्रयत्न करा. 

तुळ- अचाक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही आखलेले बेत यशस्वी ठरतीलच. तुमच्या योजनांना यशही मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. 

वृश्चिक- आत्मविश्वास आणि धाडसाने महत्त्वाची कामं पूर्ण करा. यश मिळेल. काही गोष्टींचा त्यागही करावा लागेल. एखादं काम मार्गी लावण्यासाठी काही पैसेही खर्च करावे लागू शकतात. 

धनु- फायद्याची परिस्थिती आहे. आज पैशांशी निगडीत कामं पूर्ण करा. वायफळ खर्चांपासून दूर राहा. बऱ्याच अंशी यशस्वी ठराल. प्रवासयोग आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडचणी दूर होतील. 

मकर- घरी जास्तीत जास्त वेळ द्यावा लागू शकतो. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस चांगला आहे. दिवस चांगला असेल. आरोग्यही चांगलं असेल. एखादी अशी माहिती मिळेल, ज्याचा येत्या काळात तुम्हाला फायदा होईल. उत्साही असाल. 

कुंभ- जुन्या अडचणी दूर होतील. कुटुंबात काही सुखाचे क्षण येतील. जवळच्या व्यक्तींसोबत आज संवाद साधू शकता. गुंतवणूकीचे नवे बेत आखाल. बोलता- बोलता एखाद्या व्यक्तीसोबतचं नातं आणखी दृढ होईल. शक्य असेल तितकीच गुंतवणूक आज करा. 

मीन- कोणताही बेत न आखता एखादं मोठं काम पूर्ण होईल. तुमच्या नातेसंबंधांमध्ये अचानकच काही बदल होण्यास सुरुवात होईल. अनेकांचा रुसवा दूर करण्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुम्ही बरेच उत्साही असाल. काही खास व्यक्तींशी मैत्री होऊ शकते.