Weekly Horoscope : 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023; काहींना पैसे मिळतील तर काहींनी आरोग्याची काळजी घ्यावी, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Horoscope Weekly (14- 20 August 2023): या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्तींना भरपूर पैसे मिळणार आहेत. तर काही व्यक्तींच्या घरात धार्मिक कार्य घडतील. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!

सुरभि जगदीश | Updated: Aug 12, 2023, 08:35 PM IST
Weekly Horoscope : 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023; काहींना पैसे मिळतील तर काहींनी आरोग्याची काळजी घ्यावी, पाहा साप्ताहिक राशीभविष्य title=

Horoscope Weekly (14- 20 August 2023): येत्या 14 ऑगस्टपासून नवा आठवडा सुरु होणार आहे. या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्तींना भरपूर पैसे मिळणार आहेत. तर काही व्यक्तींच्या घरात धार्मिक कार्य घडतील. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक राहणार आहे. या आठवड्यात परिस्थितीत अचानक बदल होणार नाही, परंतु गेल्या आठवड्यात उद्भवलेल्या त्रासांमध्ये सुधारणा होण्याची स्थिती असेल. ऑफिसमधील प्रकरणांमध्ये तणाव कमी होण्यास सुरुवात होईल. 

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची खूप गरज भासेल. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करा. या आठवड्यात कोणालाही वचन देण्यापूर्वी विचार करा. मोठ्या पैशाचे व्यवहार टाळा. बाहेरचे अन्न खाणे टाळा. 

मिथुन (Gemini)

या आठवड्यात तुमच्या कुटुंबात सुसंवाद वाढण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही शुभ कार्यासाठी परिस्थिती निर्माण होणार आहे. पालकांना मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात चांगली स्थिती दिसून येईल. 

कर्क (Cancer)

आठवडा तुमच्यासाठी मानसिकदृष्ट्या गोंधळात टाकणारा असू शकतो. या आठवड्यात विश्वासू व्यक्तीचा सल्ला घेऊन काम करा. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. या आठवड्यात तुम्ही कुठेतरी सहलीलाही जाऊ शकता. व्यापारी वर्गासाठी आठवडा अनुकूल असणार आहे.

सिंह (Leo)

या आठवड्यात मान-सन्मान वाढण्याची, ऑफिसमध्ये प्रगती आणि घरात शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. यासोबतच आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये धावपळ करावी लागू शकते. 

कन्या (Virgo)

कन्या राशीसाठी आठवडा चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. एकाच वेळी चांगली बातमी आणि कुठूनतरी वाईट बातमी मिळू शकणार आहे. या आठवड्यात तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकणार नाही, त्यामुळे सावधगिरी बाळगा. 

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुमचं मन प्रसन्न राहील आणि जीवन सर्व प्रकारे अनुकूल वाटेल. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.

वृश्चिक (Scorpio)

या आठवड्यात आयुष्य तुमच्यासमोर अनेक पर्याय आणेल. अंतिम निर्णयाबद्दल तुम्हाला संभ्रम वाटेल. एकाच वेळी अनेक जॉब ऑफर तुमच्या समोर येण्याची दाट शक्यता आहे. निर्णय घेण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्यांची आणि विश्वासू व्यक्तीची मदत घेऊ शकता. गुप्त शत्रूंपासून सावध राहा.

धनु (Sagittarius)

या आठवड्यात तुम्ही अनेक नातेवाईक आणि अनोळखी व्यक्तींना भेटण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत आनंद मिळू शकेल. वैवाहिक जीवनातही प्रेम वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. 

मकर (Capricorn)

हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी थोडा व्यस्त असणार आहे. तुम्हाला एकाच वेळी अनेक प्रकारच्या कामांना वेळ द्यावा लागेल. ज्या लोकांची मालमत्ता किंवा वाहन खरेदी-विक्रीशी संबंधित काम अडकले आहे त्यांची कामे या आठवड्यात पूर्ण होतील. कौटुंबिक परिस्थितीत शांतता राहील. 

कुंभ (Aquarius)

या राशीसाठी आठवडा आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरणार आहे. जुने अडकलेले पैसे परत मिळतील. नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे. मालमत्ता संबंधित कामांसाठीही आठवडा चांगला आहे. नोकरदार लोकांचे त्यांच्या बॉसशी काही मतभेद असू शकतात, परंतु या काळात संयमाने काम करावं. 

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आठवडा उत्तम असणार आहे. या आठवड्यात तुम्ही त्या गोष्टी देखील करू शकाल, ज्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात. धार्मिक, आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल कराल. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोक कामाच्या संदर्भात प्रवास करतील. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )