लंडन : २००० नंतर बांग्लादेशला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल १७ वर्षांनी आयसीसीच्या कसोटी क्रिकेटचा विस्तार करण्यात आलाय.
क्रिकेट विश्वात आणखी दोन संघ नव्याने दाखल झालेत. त्यांना आता कसोटी क्रिकेटचा दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे कसोटी क्रिकेटला आता दोन नवे सदस्य मिळालेत.
आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या संघांनी क्रिकेटमध्ये चांगली प्रगती केली. त्यामुळे त्यांना आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व आणि कसोटी संघांचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आज आयसीसीच्या बैठकीत या दोन नव्या संघाना कसोटीचा दर्जा देण्याचा निर्णय झाला. यामुळे कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या आता १२ झालेय.
Afghanistan and Ireland confirmed as full members after a unanimous vote at ICC full council meeting. pic.twitter.com/hfIhNUhPSH
— ANI (@ANI_news) June 22, 2017
अफगाणिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघटनांनी आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, लंडनमध्ये सुरु असलेल्या आयसीसीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि आयर्लंडला कसोटी दर्जा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
२००० साली बांग्लादेशला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल १७ वर्षांनी आयसीसीच्या कसोटी परिवाराचा विस्तार झाला. आहे. अफगाणिस्तान हा कसोटी दर्जा लाभलेला आशिया खंडातील पाचवा देश ठरला आहे. तर आयर्लंडचा संघ कसोटी दर्जा मिळवणारा युरोपमधील दुसरा देश आहे.