वनडे सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका, हा खेळाडू बाहेर

टेस्ट सीरिजनंतर आता १ फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे.

Updated: Jan 30, 2018, 09:54 PM IST
वनडे सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका, हा खेळाडू बाहेर  title=

मुंबई : टेस्ट सीरिजनंतर आता १ फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. पण या सीरिजआधीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. ६ मॅचच्या या वनडे सीरिजमधून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स बाहेर झाला आहे. बोटाला दुखापत झाल्यामुळे एबी डिव्हिलियर्सला भारताविरुद्धच्या वनडे सीरिजला मुकावं लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेनं अजूनही एबी डिव्हिलियर्सच्या पर्यायी खेळाडूची निवड केलेली नाही. शेवटच्या तीन मॅचसाठी एबी डिव्हिलियर्स पूर्णपणे फीट होईल असं बोललं जातंय. तिसरी टेस्ट सुरु असतानाच एबी डिव्हिलियर्सच्या बोटाला दुखापत झाली होती. यी दुखापत बरी व्हायला दोन आठवडे लागणार आहेत. त्यामुळे चौथ्या वनडेसाठी एबी फिट होईल, अशी आशा आहे.