AB de Villiers पुन्हा का खेळणार नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने? कोचचा मोठा खुलासा

एबी डिव्हिलियर्स टी 20 वर्ल्डकप का खेळू शकणार नाही? कोच बाउचरकडून खुलासा

Updated: May 20, 2021, 08:28 AM IST
AB de Villiers पुन्हा का खेळणार नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने? कोचचा मोठा खुलासा title=

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एबी डिव्हिलियर्स पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामने खेळणार का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे. गेल्या काही महिन्यांपासून डिव्हिलियर्स पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल याची आतूरतेनं वाट पाहात होते. मात्र आता ही वाट पाहणं व्यर्थ ठरलं आहे. एबी डिव्हिलियर्स पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळताना दिसणार नाही. या संदर्भात कोचनं मोठा खुलासा देखील केला आहे.

दक्षिण अफ्रिका संघाचे कोच मार्क बाउचर यांच्या म्हणण्यानुसार एबी डिव्हिलियर्स टी 20 फॉरमॅटमध्ये जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक आहे. मात्र टी 20 वर्ल्डकपमध्ये तो सहभागी होणार नाही. टी 20 वर्ल्डकपमध्ये सहभागी न होण्यामागे त्याची काही वैयक्तिक कारणं दक्षिण आफ्रिकेने (सीएसए) मंगळवारी जाहीर केले की एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय सेवानिवृत्तीतून न परतण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोच बाउचर यांनी संदर्भात खुलासा केला आहे. एबी डिव्हिलियर्स संघातील खेळाडूंचा खूप सन्मान करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर आता पुन्हा संघातील कोणत्याही खेळाडूची जागा घेऊन खेळण्यासाठी राजी नाही. एबी डिव्हिलियर्सच्या सर्व निर्णयांचा आम्ही सन्मान करतो. दुर्भाग्य आहे की काही खास कारणांमुळे तो टीममध्ये पुन्हा येऊ शकतं नाही. 

WTC final सामना ड्रॉ किंवा टाय झाला तर? काय असतील नियम?

एबी डिव्हिलियर्सने मे 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची अचानक घोषणा केली. त्यानंतर क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांची मोठी निराशा झाली. 2019मध्ये त्यांनी वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र टीम मॅनेजमेंटने त्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता.