...तर भारत टी-20मध्येही इतिहास रचणार!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला.

Updated: Oct 5, 2017, 04:36 PM IST
...तर भारत टी-20मध्येही इतिहास रचणार! title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला. वनडेनंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ मॅचच्या टी-20 सीरिजला सुरुवात होत आहे. या सीरिजमधल्या तिन्ही टी-20 जिंकल्या तर आयसीसीच्या क्रमवारीमध्ये भारत पहिल्या क्रमांकाच्या जवळ पोहोचेल.

टी-20 क्रमवारीमध्ये भारत ११६ पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत ३-०नं जिंकला तर क्रमवारीमध्ये पाकिस्तानला मागे टाकून भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. टी-20 क्रमवारीमध्ये १२५ पॉईंट्ससह न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान १२१ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजनंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये २-१नं विजय मिळवला तर टेस्ट आणि वनडे पाठोपाठ टी-20मध्येही पहिल्या क्रमांकावर जायची नामी संधी भारताला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली टी-20 ७ ऑक्टोबरला रांचीमध्ये, दुसरी टी-20 १० ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये आणि तिसरी टी-20 १३ ऑक्टोबरला हैदराबादला होईल.