दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दारूण पराभवानंतर राहुल द्रविड म्हणाले...

दक्षिण आफ्रिका टीमकडून दोन्ही सिरिजमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं विधान केलं आहे.

Updated: Jan 24, 2022, 02:39 PM IST
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दारूण पराभवानंतर राहुल द्रविड म्हणाले... title=

केपटाऊन : टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून तिसऱ्या वनडे सामन्यातही पराभव स्विकारावा लागला आहे. तिसऱ्या सामन्यात भारताचा 4 रन्सने पराभव झालाय. तीन वनडे सामन्यांच्या सिरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 3-0 असा पराभव केला. दक्षिण आफ्रिका टीमकडून दोन्ही सिरिजमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं विधान केलं आहे.

राहुल द्रविड यांच्या म्हणण्याप्रमाणे, टीम इंडियामध्ये त्या दोन खेळाडूंचा समालेश केला असता तर परिस्थिती इतकी बिघडली नसती. आम्हाला सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आणि सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजाची उणीव भासली. 

द्रविड म्हणाले, टीमची रिदम बॅलन्सवर अवलंबून असते. त्यामुळे टीमला समतोल साधणारे आणि सहाव्या, सातव्या, आठव्या क्रमांकावर पर्याय देणारे खेळाडू सिलेक्शनसाठी उपलब्ध नव्हते.

राहुल द्रविड पुढे म्हणाले, "हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा फिटनेसच्या कारणामुळे बाहेर होते. ते परतल्यानंतर टीम मजबूत होण्यास मदत मिळेल. यामुळे आम्हाला वेगळ्या पद्धतीने खेळण्याचीही सोय निर्माण होईल."

जेव्हा फलंदाज चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो तेव्हा त्याला तुम्हाला कळलं पाहिजे की टीमची गरज काय आहे. तिन्ही सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर लवकर बाद झाला. सर्व खेळाडू चांगला खेळ करतात पण टीमध्ये प्रत्येक स्थानासाठी खूप स्पर्धा आहे आणि अशा परिस्थितीत ते सोपं नाही, असंही द्रविड म्हणालेत