बंगळूरू : टी-20 सिरीजनंतर टीम इंडियाने टेस्ट सिरीजवरंही कब्जा केला आहे. बंगळूरूमध्ये झालेल्या पिंक-बॉल टेस्टमध्ये श्रीलंकेचा 238 रन्सने पराभव करत सिरीज 2-0ने आपल्या नावे केली. श्रीलंकेविरूद्धची दुसरी टेस्ट अवघ्या 3 दिवसांत आटोपली. दरम्यान सामन्यानंतर झालेल्या अवॉर्ड सेशनमध्ये कर्णधार रोहित शर्माला विजयाची ट्रॉफी देण्यात आली. मात्र यावरून काही प्रश्न उपस्थित होताना दिसले.
टेस्ट सिरीजची ट्रॉफी हातात आल्यानंतर रोहितने ती ट्रॉफी एका खेळाडूच्या हातात दिली. हा खेळाडू नेमका कोण याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत. या खेळाडूचा टीमसाठी अजून डेब्यूही झालेला नाही.
ट्रॉफी घेऊन जेव्हा रोहित शर्मा ग्रुप फोटोसाठी टीममजवळ पोहोचला तेव्हा त्याने प्रियंक पांचालच्या हातात ही ट्रॉफी सोपवली. फोटो सेशनमध्ये प्रियंक पांचाल विजयाची ट्रॉफी घेऊन उभा आहे आणि त्याच्या अवतीभोवती इतर खेळाडू दिसतायत. प्रियांकसोबत युपीचा सौरभ कुमारंही त्याच्या सोबत फोटोमध्ये दिसतोय. त्याचा टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला होता मात्र प्लेईंग 11 मध्ये त्याला संधी मिळाली नाही.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या काळात ही गोष्ट होत होती. जेव्हा कर्णधार सिरीज जिंकल्यानंतर कोणताही ट्रॉफी किंवा कप ज्यूनियर किंवा नवीन खेळाडूच्या हातात दिला जात होता. विराट कोहलीने देखील त्याच्या काळात असं केलं असून आता रोहित शर्माही देखील तेच करतोय.