MCA निवडणुकीत अजिंक्य नाईक यांचा 'इतक्या' मतांनी विजय, आशिष शेलार यांना धक्का

Mumbai Cricket Association Elections : अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) नवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी आशिष शेलार यांचे उमेदवार संजय नाईक यांचा २२१-११४ मतांनी पराभव केला.

सौरभ तळेकर | Updated: Jul 23, 2024, 07:56 PM IST
MCA निवडणुकीत अजिंक्य नाईक यांचा 'इतक्या' मतांनी विजय, आशिष शेलार यांना धक्का title=
Ajinkya Naik victory in MCA elections

MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी विजय मिळवला आहे. 107 मतांनी अजिंक्य नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला अन् संजय नाईक (Sanjay Naik) यांचा केला पराभव केला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA Election) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रकिया संपली आणि एकूण 375 पैकी 335 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी झाल्यानंतर अजिंक्य नाईक यांना विजयी घोषित करण्यात आलं. अमोल काळे यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली होती.

निवडणूक निकालानंतर आता अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA Election) नवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी आशिष शेलार यांचे उमेदवार संजय नाईक यांचा 221-114 अशा मतांच्या फरकाने पराभव केला. संजय नाईक यांच्या पराभवामुळे आता आशिष शेलार यांना मोठा धक्का बसला आहे. 

मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यक्षेत्र हे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डहाणू, बदलापूरपर्यंत आहे. देशाच्या क्रिकेटच्या वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे. यंदाची मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक रंगतदार होणार अशी चर्चा देखील झाली होती. अशातच सर्वांची धाकधूक वाढवणाऱ्या या लढतीमध्ये अजिंक्य नाईक यांनी विजय मिळवला आहे.

मतदान कोण करतं?

मुंबईत एकूण 329 क्रिकेट क्बल असून या क्लबचं प्रतिनिधित्व मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे आहे. या 329 क्लबचा प्रत्येकी एक सदस्य निवडणुकीत मतदन करतो. याशिवाय मुंबईतल्या राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या 40 खेळाडूंनाही मतदानाचा हक्क असतो. म्हणजे एकूण 369 मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार पॅनेलचे 11 सदस्य निवडून आले होते. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पवार-शेलार गटाचे अमोल काळे आणि माजी क्रिकेटर संदीप पाटील यांच्यात लढत होती, अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना 158 मतं पडली होती. त्यामुळे अमोल काळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. टी20 वर्ल्ड कप 2024 दरम्यान न्यूयॉर्कमध्ये अमोल काळे यांचं निधन झालं. त्यामुळे अध्यक्षपदाची जागा रिक्त होती.