Ajinkya Rahane ला पुन्हा टीममध्ये घ्या; विराट कोहलीच्या 'या' चुकीमुळे होतेय मागणी

चाहत्यांना मराठमोळा खेळाडू आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ची आठवण झाली आहे. त्यामुळे आता अजिंक्य रहाणेला पुन्हा संधी मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Updated: Feb 12, 2023, 10:23 PM IST
Ajinkya Rahane ला पुन्हा टीममध्ये घ्या; विराट कोहलीच्या 'या' चुकीमुळे होतेय मागणी title=

Virat Kohli Dropping Catches : टीम इंडियामध्ये सर्वात फीट खेळाडू कोण असेल, तर प्रत्येकाचं उत्तर असेल ते म्हणजे विराट कोहली (Virat Kohli). आणि सहाजिकच हे उत्तर अगदी 101 टक्के खरं आहे. विराट कोहली फिटनेसच्या जोरावर सामन्यामध्ये उत्तम फिल्डींग देखील करतो. मात्र गेल्या काही काळापासून विराट कोहली फिल्डींगच्या बाबतीत सातत्याने चाहत्यांनी निराशा करताना दिसतोय. नुकतंच ऑस्ट्रेलियाविरूद्ध (Australia Team) झालेल्या टेस्टमध्ये विराटने 2 कॅचेस् सोडल्या. 

मुख्य म्हणजे विराट स्लिपमध्ये जिथे फिल्डिंग करतोय तिथे तो सतत कॅच सोडतो. ऑस्ट्रेलियाविरूद्ध कॅच सोडण्याची ही त्याची काही पहिली वेळ नव्हती विराटने बांगलादेश दौऱ्यावर टेस्ट सामन्यांमध्येही एक कॅच सोडला होता. विराटच्या या फ्लॉप फिल्डींगमुळे आता चाहत्यांना मराठमोळा खेळाडू आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ची आठवण झाली आहे. त्यामुळे आता अजिंक्य रहाणेला पुन्हा संधी मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अजिंक्य रहाणेच्या नावे रेकॉर्ड

अजिंक्य रहाणे गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाकडून टेस्टसाठी स्लिपमध्ये फिल्डींग करतत होता. स्पिनर गोलंदाजांविरुद्ध त्याची कॅच घेण्याची क्षमता अफलातून होती. टेस्ट सामन्यात फिल्डर म्हणून सर्वाधिक 8 कॅच घेण्याचा जागतिक रेकॉर्ड देखील त्याच्याच नावे आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या 2015 च्या टेस्ट सामन्यामध्ये अजिंक्य रहाणेने हा पराक्रम केला होता. त्याने 8 पैकी 6 कॅच हे स्पिन गोलंदाजीवर पकडले होते. गेल्या वर्षी त्याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि त्यानंतर टीम इंडियाकडून कॅच सोडण्याचा सपाटा जणू सुरूच झाला.

विराटने सोडले 100 कॅचेस

विराट कोहलीने (Virat Kohli) इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 100 हून अधिक कॅच सोडले आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टेस्ट सामन्यापूर्वी विराटने इंटरनॅशनल सामन्यांमध्ये 99 कॅच सोडले होते. या सामन्यात त्याने 3 कॅच सोडले. या सामन्यापूर्वी विराटने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 396 सामने खेळलेत. त्याच्या नावावर 295 कॅच आहेत. क्रिकेटच्या इतिहासामध्ये फिल्डर म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट सातव्या क्रमांकावर आहे.

Virat Kohli ने सोडला सोपा कॅच

कोहलीने वॉर्नरचा ड्रॉप केलेला कॅचचा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. ऑस्ट्रेलिया टीमच्या दुसऱ्या डावाच्या 6 ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर डेव्हिड वॉर्नरचा कॅच विराटने स्लिपमध्ये सोडला. यावेळी वॉर्नरचा कॅच सोडल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि अश्विन चांगलेच संतापलेले दिसले. इतकंच नाही तर कोहली स्वतः देखील त्याच्या फिल्डींगवर नाराज झालेला दिसून आला.