अजिंक्य रहाणेने शेअर केला गोंडस मुलीचा फोटो

पहिल्यांदाच शेअर केला फोटो 

Updated: Oct 7, 2019, 04:25 PM IST
अजिंक्य रहाणेने शेअर केला गोंडस मुलीचा फोटो

मुंबई : भारतीय टेस्ट टीमचा उपकॅप्टन अजिंक्य रहाणे शनिवारी बाबाझाला आहे. अजिंक्यची पत्नी राधिका धोपावकरने मुलीला जन्म दिला आहे. पण त्यावेळी अजिंक्य तेथे उपस्थित नव्हता. अजिंक्य रहाणे भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात विशाखापट्टनम टेस्ट खेळत होता. 

यामुळे शनिवारी मुलगी आणि पत्नीची भेट अजिंक्यला घेता आली नाही. पण सामना संपताच अजिंक्य मुंबईला रवाना झाला. सोमवारी अजिंक्यने आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी अजिंक्यसोबत त्याची पत्नी राधिका आणि मुलगी देखील आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hello 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

जुलै महिन्यात राधिका गरोदर असल्याचं अजिंक्य रहाणेने सांगितलं होतं. 'हॅलो लव' अशी कॅप्शन टाकत अजिंक्यने जुलै 2019 मध्ये राधिका गरोदर असल्याचा खुलासा केला होता. दोघांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता ज्यामध्ये राधिकाचे बेबी बंप दिसत होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

अजिंक्य आणि राधिकाचं 2014 मध्ये लग्न झालं होतं. दोघं एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखत होते. खूप काळ यांनी एकमेकांना डेट केलं आहे. अजिंक्यची राधिकाशी ओळख शाळेत झाली होती. त्यानंतर त्यांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. 

अजिंक्य रहाणे बाबा झाल्याची पहिली बातमी सोशल मीडियावर हरभजन सिंहने सांगितली. ट्विटरवरून शुभेच्छा देत पोस्ट लिहिली की, नवीन-नवीन बाबा झालेल्या अजिंक्य रहाणेला शुभेच्छा... आशा करतो की, आई आणि छोटी राजकुमारी ठीक असेल. जीवनातील अतिशय मजेदार क्षण आता सुरू झाला आहे.