South Africa vs Netherlands : यंदाचा विश्वचषकात (World Cup 2023 ) दुबळे समजले जाणारे संघ कमाल करताना दिसतं आहे. दुबळ्या नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ केला आहे. हा वर्ल्डकपमधील दुसऱ्या उलटफेर आहे. गतविजेता इग्लंडला अफगाणिस्तानने हरवलं त्यानंतर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 2 सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची नेदरलँड्सच्या खेळासमोर फज्जा उडाला. (Another shock result at the World Cup 2023 Netherlands beat mighty South Africa)
246 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला घाम फुटला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 207 धावांवर गुंडाळलं. नेदरलँड्स गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मैदानाबाहेरचा रस्ता गाठावा लागला. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डी कॉक शतकी हॅटट्रिक करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र नेदरलँड्सच्या कॉलिन अकरमन याने त्याचं स्वप्न धुळीस मिळवलं. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 42.5 ओव्हर्समध्ये 207 धावांवर ऑलआऊट करुन वर्ल्डकपमधील दुसऱ्या मोठा उलटफेर केला आहे. डेव्हिड मिलर वगळता संघाचा एकही फलंदाज क्रीजवर थांबून नेदरलँडच्या गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरला.
विश्वचषक 2023 मधील हा 15 वा सामना धरमशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाला. पावसामुळे नाणेफेकीला विलंब झाला मात्र तीन वाजता हा सामना सुरु झाला. शिवाय पावसामुळे 43 ओव्हरचा हा सामना खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेल जिंकून नेदरलँड्सविरोधात गोलंदाजी निर्णय घेतला.
One of the greatest @cricketworldcup upsets of all time in Dharamsala as Netherlands overcome South Africa #SAvNED : https://t.co/mqR5mKX179 pic.twitter.com/8Qs5HUSe9o
— ICC (@ICC) October 17, 2023
टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि गेराल्ड कोएत्झी.
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.