अर्जुना रणतुंगा आणि अरविंदा डिसिल्व्हानं मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळले

श्रीलंकेला १९९६ सालचा वर्ल्ड कप जिंकवून देणारे खेळाडू अर्जुना रणतुंगा आणि अरविंदा डिसिल्व्हा यांनी त्यांच्यावर लागलेले मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Updated: Aug 1, 2018, 04:11 PM IST
अर्जुना रणतुंगा आणि अरविंदा डिसिल्व्हानं मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळले title=

कोलंबो : श्रीलंकेला १९९६ सालचा वर्ल्ड कप जिंकवून देणारे खेळाडू अर्जुना रणतुंगा आणि अरविंदा डिसिल्व्हा यांनी त्यांच्यावर लागलेले मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळून लावले आहेत. श्रीलंकेचे माजी क्रिकेट प्रमुख तिलंगा सुमतीपाल यांनी रणतुंगा आणि डिसिल्व्हावर मॅच फिक्सिंगचे आरोप केले. या दोन खेळाडूंनी १९९४ साली मॅच हरण्यासाठी भारतीय सट्टेबाजांकडून १५ हजार डॉलर घेतले, असा आरोप श्रीलंकेचे माजी क्रिकेट प्रमुख तिलंगा सुमतीपाल यांनी केला.

आम्ही कोणत्याही प्रकारची लाच घेतली नाही आणि मॅचही फिक्स केलेली नाही, असं रणतुंगा आणि डिसिल्व्हा म्हणाले. जर मी मॅच फिक्स केली होती तर सुमतीपाल यांनी त्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीमध्ये मला का घेतलं असा सवाल डिसिल्व्हानं उपस्थित केला. सुमतीपाल यांचे आरोप मी गंभीरपणे घेत नाही, अशी प्रतिक्रिया डिसिल्व्हानं दिली. 

रणतुंगा आणि डिसिल्व्हा हे पहिले दोन खेळाडू आहेत ज्यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्याचं सुमतीपाल म्हणाले आहेत.