Asia Cup Final 2022 : पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही टीम इंडिया फायनलमध्ये पोहचणार?

रविवारी (4 सप्टेंबर) सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने भारतावर 5 विकेट्सने (IND vs PAK)  दणदणीत विजय मिळवला.

Updated: Sep 5, 2022, 11:25 PM IST
Asia Cup Final 2022 : पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही टीम इंडिया फायनलमध्ये पोहचणार? title=

Asia Cup 2022 Final : आशिया कप-2022 आता सुपर-4 टप्प्यात पोहोचला आहे. एकापेक्षा एक सरस सामने पाहायला मिळत आहेत. रविवारी (4 सप्टेंबर) सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने भारतावर 5 विकेट्सने (IND vs PAK) दणदणीत विजय मिळवला. यानंतर आता अंतिम फेरीचा मार्ग रंजक झाला आहे. सुपर-4 मधील टीम इंडियाचा (Team India) हा पहिलाच सामना होता. ज्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. अशा स्थितीत भारतीय संघ अजूनही अंतिम फेरी गाठू शकेल का, यासाठी हे समीकरण समजून घ्यावं लागेल. (asia cup 2022 ind vs pak team india points table final scenario)

प्वाइंट्स टेबलमध्ये कोण कुठे? 

आशिया कपच्या सुपर-4 मध्ये एकूण चार टीम्स आहेत. यामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. आतापर्यंत चारही संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला असून पॉइंट टेबलचे चित्र स्पष्ट आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका प्रत्येकी एक सामना जिंकून टॉप-2 मध्ये आहेत. भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.

टीम इंडिया फायनलला पोहचणार? 

टीम इंडियाला अजून सुपर-4 मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचं. टीम इंडियाने हे दोन्ही सामने जिंकले तर अंतिम फेरीत पोहोचणं निश्चित होईल. कारण टीम इंडियाचे 4 पॉइंट्स होतील. पण टीम इंडियाचा खराब फॉर्म कायम राहिल्यास फायनलमध्ये पोहचणं कठीण होऊ शकतं.

टीम इंडिया-पाकिस्तान फायनल?

पाकिस्तानला येत्या सामन्यात श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा सामना करायचाय. पाकिस्तानचा या दोन्ही सामन्यात पराभव झाला तर त्याला अंतिम फेरी गाठता येणार नाही. पण जर पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले, तर अंतिम सामन्यातही पोहोचेल. तसेच त्यानंतर 11 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये विजेतेपदासाठी काटे की टक्कर होऊ शकते.