Video : Asia Cup साठी पाकिस्तानी चाहता सज्ज; म्हणाला, एका किडनीवर....

28 ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान असा थरार पाहायला मिळणार आहे.

Updated: Aug 25, 2022, 05:02 PM IST
Video : Asia Cup साठी पाकिस्तानी चाहता सज्ज; म्हणाला, एका किडनीवर.... title=

Asia Cup 2022 : आशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) भारतीय संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे. मात्र पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतीमुळे आशिया कपमधून (Asia Cup 2022) बाहेर पडला आहे. त्यामुळे 
पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

28 ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (india vs pakistan) असा थरार पाहायला मिळणार आहे. हा सामना दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार असून दोन्ही बाजूच्या चाहत्यांमध्ये यासाठी मोठी उत्सुकता आहे.

शाहिन आफ्रिदीमुळे पाकिस्तानी चाहते चिंतेत असले तरी पाकिस्तानातल्या एका चाहत्याला सामना जिंकण्याचा मोठा आत्मविश्वास आहे.

ओ भाई मारो मुझे या एका डायलॉगमुळे जगभरात पोहोचलेल्या मोकिन शाकिबचा (Momin Shaheen) आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहिनच्या अनुपस्थितीत पाकिस्तानी संघासह मोमिनही आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. एकाच पायात बॅटिंग पॅड घालून तो सरावासाठी उतरला आहे. मोमिनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जर पाकिस्तानी संघाला गरज असेल तर मी तयार आहे, असे म्हटले आहे.

व्हिडीओत प्रॅक्टिस करत असताना मोमिनला एक जण येऊन काय करत आहे असे विचारतो. त्यावर मोमिन उत्तर देतो. "तयारी करत आहे. दुखापतीमुळे शाहिन आफ्रिदी आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे कोणाला तरी विचार करावाच लागेल. जर संघाला माझी गरज लागत असेल तर मीच मैदानात जाऊन एक नाही दोन नाही तर तीन तीन शतकं करेन."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Momin Saqib (@mominsaqib)

या व्हिडीओमध्ये मोमिन एकच पॅड घालून प्रॅक्टिस करत होता तेव्हा त्याला याने कशी बॅटिंग करणार असे एकजण विचारतो. यावर मोमिन म्हणतो की, माणूस एका किडनीवर चालू शकतो, तर एका पॅडवर बॅटिंग का नाही होऊ शकत?

2019 साली मोमिन शाकिब वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान चर्चेत आला होता. तेव्हा भारतीय संघाने पाकिस्तानला नमवले होते. त्यावेळी मोमिनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पाकिस्तानच्या खेळावरुन त्यांनी संघावर टीका केली होती. त्यावेळी त्याचा ओ भाई मारो मुझे असा डायलॉग व्हायरल झाला होता.