भरकटलेल्या खेळाडूला मुलीने मार्ग दाखवला, त्याने गोल्ड मेडल जिंकलं, तिला त्याने शोधून गिफ्ट दिलं

पदक जिंकण्याचं स्वप्न जवळजवळ संपल्यात जमा होतं. पण एक मुलगी काही क्षणासाठी त्याच्या आयुष्यात आली आणि आख्खं आयुष्यचं 

Updated: Aug 13, 2021, 09:14 PM IST
भरकटलेल्या खेळाडूला मुलीने मार्ग दाखवला, त्याने गोल्ड मेडल जिंकलं, तिला त्याने शोधून गिफ्ट दिलं

टोकिओ : जमेकाचा धावपटू हांसलो पार्चमेंट याचं टोकिओ ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न जवळजवळ संपल्यात जमा होतं. पण एक मुलगी काही क्षणासाठी त्याच्या आयुष्यात आली आणि आख्खं आयुष्यचं तिने बदलवून टाकलं. तो क्षण त्याच्या आयुष्यातला सुवर्णक्षण ठरला. , Tokyo Olympics 2020 टोकिओतील ऑलिम्पिक नगरीत धावपटू हांसले पार्चमेंटला एका ठिकाणी पोहचल्यावर असं लक्षात आलं की तो चुकीच्या ठिकाणी पोहोचला आहे. त्यापेक्षाही धक्कादायक बाब अशी होती की, त्याच्या सामन्याला ज्या स्टेडिअममध्ये सुरुवात होणार होती. ते ठिकाण तेवढ्या वेळेत सहज गाठणं त्याला शक्य नव्हतं.

पण एक स्वंयमसेवक युवती त्याच्या मदतीला आली, तिने त्याला सांगितलं की, तू ही टॅक्सी पकडून जा, कदाचित तू सामना सुरु होण्याआधी पोहोचशील. पण त्याच्याकडे टॅक्सीला पैसे नव्हते, तेव्हा धावपटू हांसलो पार्चमेंटला फक्त रडू यायचं बाकी होतं, त्याने तिला हात जोडून टॅक्सीसाठी पैसे मागितले, मी तुला परत करीन असं वचनही दिलं, त्या मुलीने हसत मुखाने त्याला पैसेही दिले.

यानंतर त्याने टॅक्सीने ग्राऊंड गाठलं, त्याला वॉर्मअपलाही पुरेसा वेळ मिळाला, आणि जमेकाचा धावपटू Hansle Parchment सलो पार्चमेंट याने ११० मीटर रेसमध्ये गोल्ड मेडल जिंकलं, यानंतर त्याने त्या स्वंयमसेविकेला शोधून काढलं, तिला पैसे देखील परत केले आणि तिला त्याने मिळवलेलं गिफ्ट देखील दाखवलं. 

एवढंच नाही तर तिला आपल्या देशात येण्याचं आमंत्रण देखील दिलं. या सिलसिला येथेच थांबला नाही, जमेकाचे पर्यटन मंत्री एडमंड बार्टलेट यांनी आपल्या देशात येण्याचं आमंत्रण दिलं, खेळाडू हांसलो पार्चमेंटने तिला एक ट्रॅकसूट देखील गिफ्ट दिला.

जमेकाचे पर्यटन मंत्री एडमंड बार्टलेट म्हणाले, हे महत्त्वाचं नाही की आपण जगात कुठे आहोत, आमच्या खेळाडूला त्या तरुणीने मदत केली हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये हांसले यांनी लिहिलंय, ''त्या दिवशी आणि तो गोल्डन क्षण येण्याआधी काय झालं?, मी त्या स्वंयमसेविकेला पाहिलं आणि मला भीक मागावी लागली, कारण खेळाडूला याशिवाय दुसरा पर्याय काय असतो, पण त्या तरुणीने मला काही पैसे दिले, मी टॅक्सीने मी वॉर्मअप ट्रॅकपर्यंत पोहोचलो, मला वॉर्मअपला पुरेसा वेळ मिळाला, ते सर्वकाही शानदार होतं''