चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये भारताच्या अध्यक्षीय ११ संघाचा १०३ रन्सनं पराभव झाला आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियानं ५० ओव्हरमध्ये ३४७/७ रन्स केल्या. वॉर्नर(६४), स्टिव्ह स्मिथ (५५), हेड (६५) आणि स्टॉयनिस(७६) यांनी ऑस्ट्रेलियाला एवढ्या रन्सपर्यंत पोहोचवलं.
भारताच्या खुशांग पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या तर आवेश खान, खेजरोलिया आणि कर्नेवारला प्रत्येकी एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या ३४८ रन्सचा पाठलाग करताना भारताचा अध्यक्षीय ११ संघ ४८.२ ओव्हरमध्ये २४४ रन्सवर ऑलआऊट झाला. भारताच्या एकाही खेळाडूला हाफ सेंच्युरीही करता आली नाही. ओपनर श्रीवत्स गोस्वामीनं सर्वाधिक ४३ रन्स बनवल्या.
ऑस्ट्रेलियाच्या अॅगरनं ४ विकेट घेतल्या तर रिचर्डसनला २ विकेट घेण्यात यश आलं. फॉकनर, झम्पा आणि स्टॉयनिसला प्रत्येकी एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत ५ वनडे आणि तीन टी-20 खेळणार आहे. १७ सप्टेंबरपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे.
पहिल्या तीन वनडेसाठी भारतीय संघ- विराट कोहली (कॅप्टन), रोहीत शर्मा, शिखर धवन, के. एल.राहूल, मनिष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, अक्सर पटेल, कुलदिप यादव, युझुवेंद्र चहाल, बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शमी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचचं वेळापत्रक
१७ सप्टेंबर- पहिली वनडे- चेन्नई, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता
२१ सप्टेंबर- दुसरी वनडे- कोलकता, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता
२४ सप्टेंबर- तिसरी वनडे- इंदूर, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता
२८ सप्टेंबर- चौथी वनडे- बंगळुरू, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता
१ ऑक्टोबर- पाचवी वनडे- नागपूर, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता
टी-२०
७ ऑक्टोबर- पहिली टी-20- रांची, डे-नाईट, सायंकाळी ७ वाजता
१० ऑक्टोबर- दुसरी टी-20- गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजता
१३ ऑक्टोबर- तिसरी टी-20- हैदराबाद , सायंकाळी ७ वाजता