IND vs PAK: वर्ल्ड कप सामन्यात कोण जिंकणार? भारत की पाकिस्तान? बागेश्वर बाबांची मोठी भविष्यवाणी; पाहा Video

Bageshwar baba Viral Video: सध्या सोशल मीडियावर बागेश्वर बाबांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका मुलाखतीमध्ये त्यांना आगामी वर्ल्ड कपमध्ये (IND vs PAK) कोण जिंकणार? भारत की पाकिस्तान? असा प्रश्न देखील विचारला गेला.

Updated: Aug 10, 2023, 04:27 PM IST
IND vs PAK: वर्ल्ड कप सामन्यात कोण जिंकणार? भारत की पाकिस्तान? बागेश्वर बाबांची मोठी भविष्यवाणी; पाहा Video title=
bageshwar baba, Ind vs pak

Bageshwar baba, IND vs PAK: क्रिकेटची वारी म्हटल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्ड कपला (World Cup 2023) आता फक्त 2 महिने शिल्लक आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपचा थरार रंगणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती भारत आणि पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan)... दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही देश आमने सामने येणार आहेत. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार? यावर चर्चा सुरू आहे. अशातच आता बागेश्वर बाबांनी (Bageshwar baba) मोठी भविष्यवाणी यांनी केली आहे. 

सर्वांना प्रतिक्षा असलेल्या भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यासह स्पर्धेतील इतर 8 सामन्यांच्या वेळापत्रकातही (WC 2023 TimeTable) बदल करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान ( IND vs PAK) यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये रविवारी 15 ऑक्टोबर रोजी होणार होता, परंतु तो एक दिवस आधी हलवण्यात आला आहे. आता हा सामना शनिवारी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार असल्याची अधिकृत माहिती आयसीसीने (ICC) दिली आहे. अशातच देशभर चर्चेत असलेल्या बागेश्वर बाबांनी कोण जिंकणार यावर मोठं वक्तव्य केलंय.

आणखी वाचा - World Cup 2023: ना भारत ना पाकिस्तान, आश्विन म्हणतो 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!

सध्या सोशल मीडियावर बागेश्वर बाबांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका मुलाखतीमध्ये त्यांना क्रिकेट पहायला आवडतं का? असा सवाल विचारला गेला. त्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. आगामी वर्ल्ड कपमध्ये कोण जिंकणार? भारत की पाकिस्तान? असा प्रश्न देखील विचारला गेला. त्यावर बागेश्वर बाबांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. बाप बाप होता है, असं म्हणत बागेश्वर बाबांनी फक्त चार शब्दात विषय संपवला. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिगला असल्याचं दिसतंय.

पाहा Video

दरम्यान, वर्ल्ड कप तोंडावर असला तरी टीम इंडियाची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. 28 सप्टेंबरपर्यंत टीम इंडिया घोषित होणार आहे. त्यानंतर आयसीसीच्या परवानगीने छोटे मोठे बदल केले जाऊ शकतात. वर्ल्ड कपचा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईत तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकाता येथे होणार आहे. तसेच अंतिम सामन्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.