आशिया कप अंडर-१९ मधलं भारताचं आव्हान संपुष्टात

टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आशिया कपमधील या पराभवानंतर टीम इंडिया आशिया कप टूर्नामेंटमधून बाहेर झाली आहे.

Updated: Nov 15, 2017, 01:44 PM IST
आशिया कप अंडर-१९ मधलं भारताचं आव्हान संपुष्टात title=

मुंबई : टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आशिया कपमधील या पराभवानंतर टीम इंडिया आशिया कप टूर्नामेंटमधून बाहेर झाली आहे.
 
डिफेंडिंग चॅम्पियन टीम इंडियाला बांग्लादेशने 2 विकेटने हरवलं आहे. 3 दिवसात भारताचा हा दुसरा पराभव होता. याआधी नेपाळ संघाने भारताचा पराभव केला होता. अंडर-19 आशिया कप टूर्नामेंटमधलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

भारताच्या या पराभवनानंतर त्यांचं आशिया कपमधील प्रवास येथेच संपला आहे. सेमीफाइनल राउंडमध्ये पाकिस्तान आणि अफगानिस्तान आणि ग्रुप A मधून नेपाळ आणि बांग्लादेश यांच्यात सामना होणार आहे.

पावसामुळे 32 ओवरच्या या सामन्यामध्ये बांग्लादेशने टॉस जिंकत आधी बॉलिंगचा निर्णय घेतला होता. 16 ओव्हरमध्ये भारताचा स्कोर 85 रन वर 4 विकेट होता. पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांच्याशिवाय खेळणाऱ्या टीम इंडियाचा कोणताच फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही. 

भारताकडून 7व्या नंबरवर बॅटींगसाठी आलेल्या सलमान खानने सर्वाधिक 39 रन केले. हार्विक देसाई (21) आणि अनुज रावतने (34) रन केले. भारतासाठी हा विजय महत्त्वाचा होता. पण तसं होऊ शकलं नाही.

188 रनचं टार्गेट घेऊन उतरणाऱ्या बांग्लादेशला पिनाक घोष आणि मोहम्मद नईम शेखने चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 82 रन केले.