बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितकडे कप्तान या खेळाडूला मिळाले उपकर्णधारपद!

बीसीसीआयच्या निर्णयावर क्रीडा प्रेमींची निराशा!

Updated: Nov 24, 2022, 03:53 AM IST
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितकडे कप्तान या खेळाडूला मिळाले उपकर्णधारपद! title=

India vs Ban : भारतीय संघ पुढील महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून 3 एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. बीसीसीआयने यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे, टीका होत असताना केएल राहुलकडे पुन्हा एकदा उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या निर्णयावर क्रीडा प्रेमींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कारण के. एल. राहुल आशिया कप, वर्ल्ड कपमध्ये फेल गेला मात्र तरीही त्याच्याकडे उपकर्णधारपद दिल्याने संताप व्यक्त केला आहे. सर्वांना वाटत होतं की के. एल. राहुलचं कर्णधारपद हे काढून घेण्यात येईल.

आर अश्विन, जडेजा आणि सॅमसन यांना संघातून वगळण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराह अजूनही दुखापतीतून सावरू शकला नाही. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारलाही वनडे संघात स्थान मिळालेलं नाही. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरल्याने अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला बुधवारी पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी निवडलेल्या संघातून वगळण्यात आले. जडेजासह डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालही पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषकानंतर जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याला अनिश्चित काळासाठी संघाबाहेर ठेवण्यात आले. या दोघांऐवजी वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आणि अष्टपैलू शाहबाज अहमद यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल. 

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव