मुंबई : बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने एकूण 16 सदस्यीय संघ निवडला आहे. ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. या कसोटी मालिकेत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर पहिल्या कसोटीसाठी कर्णधारपद हे मुंबईकर अजिंक्य रहाणेला देण्यात आलं आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड 3 सामन्यांची टी 20 मालिका आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. (bcci announed team india squad against new zealand test series 2021)
पहिल्या कसोटीसाठी रहाणेकडे नेतृत्व
पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा असणार आहे. विश्रांतीनंतर दुसऱ्या कसोटीत विराट संघासोबत जोडला जाणार आहे.
तिघांना कसोटी पदार्पणाची संधी
बीसीसीसीआयने या कसोटी मालिकेसाठी तिघांना संधी दिली आहे. यामध्ये श्रेयस अय्यर, केएस भरत आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळाली आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), केएस भरत (रिझर्व्ह विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्द कृष्णा.
टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंड टीम | केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डेवेन कॉनवे, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), हेनरी निकोल्स, रॉस टेलर, विल यंग, रचिन रविंद्र, टीम साउदी, कायले जेमीन्सन, नील वॅगनर, मिचेल सँटनर, ऐजाज पटेल, विल समरविल आणि ग्लेन फिलिप्स.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर.
दुसरी कसोटी, 3 ते 9 डिसेंबर, मुंबई.