close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

क्रिकेट बंदी : पृथ्वी शॉने ट्विट करत आपल्या भावना केल्या व्यक्त

नवोदीत खेळाडू पृथ्वी शॉ याला खोकला चांगलाच महागात पडला आहे. 

क्रिकेट बंदी : पृथ्वी शॉने ट्विट करत आपल्या भावना केल्या व्यक्त

मुंबई : नवोदीत खेळाडू पृथ्वी शॉ याला खोकला चांगलाच महागात पडला आहे. खोकल्यासाठी जे औषध घेतले ते त्याच्या डोपिंगला कारणीभूत पडले. डोपिंगमध्ये सापडल्याने पृथ्वी शॉवर आठ महिने क्रिकेट खेळण्यावर बीसीसीआयने बंदी घातली आहे. दरम्यान,  बीसीसीआयच्या या निर्णयानंतर पृथ्वीने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझी अनावधनाने चूक झाली आहे. प्रामाणिकपणे मी माझी चूक स्वीकारत आहे. तर क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी पृथ्वी शॉला काळजीपूर्वक हाताळावे आणि योग्य मार्ग दाखवावा, असा सल्ला दिला आहे.

डोपिंगमध्ये दोषी आढल्याने बीसीसीआयने पृथ्वीवर आठ महिन्यांच्या बंदी घातली आहे. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर पृथ्वीने ट्विट केले आहे. पृथ्वीने अनावधनाने चूक झाल्याचे म्हटले आहे. १९ वर्षीय पृथ्वी भारताकडून दोन कसोटी सामने खेळला असून त्याने एक शतक आणि एका अर्धशतकासह २३७ धावा केल्या आहेत.  

गेल्या स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त असताना औषधे घेताना माझ्याकडून चूक झाली आहे. क्रिकेट हे माझे आयुष्य असून मुंबईचे तसेच देशाचे प्रतिनिधित्व करणे हेच माझ्यासाठी सर्वाधिक अभिमानास्पद आहे. लवकरात लवकर दमदार पुनरागमन करण्याचा माझा मानस आहे. असे ट्विट पृथ्वी शॉने केले आहे. 

पृथ्वी शॉला चांगले संभाळा, असा सल्ला क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी दिला आहे. भारतीय क्रिकेटची धूरा सांभाळणाऱ्यांनी पृथ्वी शॉला काळजीपूर्वक हाताळावे आणि योग्य मार्ग दाखवावा. या लहान मुलाने कठोर मेहनत करुन यश मिळवले आहे. त्याला योग्य मार्ग दाखवायला हवा, ट्विटरद्वारे हर्षा भोगले यांनी म्हटले आहे.