भारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी सट्टेबाजार जोरात

चॅम्पियन्स ट्रॉफी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे जगभारातील क्रिकेट फॅन्सचं लक्ष आहे.

Updated: May 31, 2017, 06:31 PM IST
भारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी सट्टेबाजार जोरात title=

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे जगभारातील क्रिकेट फॅन्सचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे सट्टाबाजाराच्याही या मुकाबल्याकडे नजरा आहेत.

सट्टाबाजारात भारतीय टीमला सर्वाधिक पसंती देण्यात आलीय. तर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला बॅट्समनमध्ये आणि जसप्रीत बुमराहला बॉलर्समध्ये सट्टेबाजांनी सर्वाधिक पसंती दिलीय. याचबरोबर पहिली, 10 आणि 15 व्या ओव्हरमध्ये किती रन्स, विकेट्स, हाफ सेंच्युरी आणि सेंच्युरीजवरही सट्टा लावण्यात येईल. फॉल ऑफ विकेट्स, फोर, सिक्स, बोल्ड, कॅचेस आणि रन आऊटवरही सट्टा लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मॅचदरम्यान प्रत्येक बॉलवरही सट्टा लावला जाईल.