चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्यापासून थरार

चॅम्पिन्स ट्रॉफीचा थरार उद्यापासून क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार यात एकूण ८ संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.

Updated: May 31, 2017, 07:26 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्यापासून थरार title=

मुंबई : चॅम्पिन्स ट्रॉफीचा थरार उद्यापासून क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार यात एकूण ८ संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. गतविजेता संघ इंडिया, यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे ४ संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जातायत. 

मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेटच्या पंढरीत म्हणजे इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून दरम्यान रंगतेय. आठव्यांदा आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत जगातील सर्वोत्तम ८ सघ विजेतेपदासाठी जिवाचं रान करतील. 

भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश हे ८ संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना आपल्याला दिसतील. यातील 'अ'गटामध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड आणि न्यूझीलंड आहे. तर बी गटात भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका आहे. या ८ संघांमध्ये एकूण १५ लढती रंगणार आहेत.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका हे संघ जरी चांगले असले तरी गतविजेता भारत संघ विजयाचा दावेदार मानला जातोय. भारताचा पहिलाच मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. यामुळे क्रिकेट फॅन्सना स्पर्धेच्या सुरुवातीलाच हायव्होल्टेज सामना पाहता येणार आहे. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये होत असल्यानं इंग्लड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या संघाना इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं फारस कठिण जाणार नाही. मात्र, भारतासमोर वातावरणाशी जुळवून घेण्याचं आव्हान असेल.

आता कोहली अँड कंपनी पुन्हा एकदा विजेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचणार का याकडेच तमाम क्रिकेट फॅन्सचं लक्ष असेल.