'विराट आता किंग कोहली राहिलेला नाही'

विराट कोहली आता टीम इंडियाच्या कोणत्याही फॉरमॅटमधील कर्णधार नाही. नुकतंच विराटने टेस्ट क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता, तर बीसीसीआयने त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून त्यापूर्वीच हटवलं होतं. या संपूर्ण प्रकरणापासून कोहली सतत चर्चेत होता. तर आता कोहलीवर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉगने प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Jan 26, 2022, 04:21 PM IST
'विराट आता किंग कोहली राहिलेला नाही' title=

मुंबई : विराट कोहली आता टीम इंडियाच्या कोणत्याही फॉरमॅटमधील कर्णधार नाही. नुकतंच विराटने टेस्ट क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता, तर बीसीसीआयने त्याला वनडेच्या कर्णधारपदावरून त्यापूर्वीच हटवलं होतं. या संपूर्ण प्रकरणापासून कोहली सतत चर्चेत होता. तर आता कोहलीवर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉगने प्रतिक्रिया दिली आहे. 

ब्रॅड हॉग म्हणाला की, विराट आता किंग कोहली राहिलेला नाही. कर्णधारपद सोडताच तो शांत झाला आहे. आता त्यांच्यात पूर्वीसारखे इमोशन राहिले नाहीत. 

ब्रॅड हॉगने त्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये सांगितलं की, कोहली आता पहिल्यासारखा दिसत नाही. तो थोडा शांत दिसतोय. आणि त्याच्यामध्ये पहिल्याप्रमाणे इमोशन्सही दिसतो नाही. हा विराट आता किंग कोहलीसारखा दिसत नाही. पूर्वी तो जबाबदार खेळाडू प्रमाणे खेळायचा, पण आता तो तसा दिसत नाही.

ब्रॅड हॉग पुढे म्हणाला की, जेव्हा विराट कर्णधार नसतो त्यावेळी त्याला समजत नाही ती मैदानावर कोणती भूमिका साकारायची. माझ्या मताप्रमाणे कोहली अजून 5 वर्ष भारतासाठी क्रिकेट खेळेल. आता टीम इंडिया पुढची सिरीज वेस्ट इंडिज विरूद्ध खेळणार असून यावेळी खूप मोठे बदल पहायला मिळणार आहेत.

कोहलीने काही काळ ब्रेक घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत रोहित शर्माने पूर्ण टीमची जबाबदारी स्विकारली पाहिजे. विराटच्या हे लक्षात येत नाहीये की अटॅकसोबत खेळाला कसं पुढे नेलं पाहिजे, असंही हॉग याने सांगितलं आहे.