पॉण्टिंग-गिलख्रिस्टच्या नेतृत्वात खेळणार लारा, अक्रम आणि युवराज

ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉण्टिंग आणि ऍडम गिलख्रिस्ट पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. 

Updated: Feb 6, 2020, 07:10 PM IST
पॉण्टिंग-गिलख्रिस्टच्या नेतृत्वात खेळणार लारा, अक्रम आणि युवराज

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉण्टिंग आणि ऍडम गिलख्रिस्ट पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. रविवारी मेलबर्नच्या जक्शन ओव्हल मैदानात बुशफायर क्रिकेट बॅशची मॅच होणार आहे. या मॅचमध्ये हे दोघं त्यांच्या टीमचं नेतृत्व करणार आहेत. पॉण्टिंग-११ आणि शेन वॉर्न-११ या टीममध्ये हा सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे प्रभावित झालेल्यांना नुकसान भरपाई म्हणून ही मॅच खेळवली जाणार आहे.

रविवारी पावसाचा अंदाज असल्यामुळे ही मॅच सिडनीच्याऐवजी मेलबर्नमध्ये खेळवली जाणार आहे. वॉर्न-११चा कर्णधार आधी शेन वॉर्न होता, पण यादिवशी वॉर्न उपलब्ध नसल्यामुळे ऍडम गिलख्रिस्ट वॉर्न-११च्या टीमचं नेतृत्व करेल.

सचिन तेंडुलकर हा पॉण्टिंग-११ टीमचा प्रशिक्षक आहे. ही चॅरिटी मॅच १०-१० ओव्हरची असणार आहे. यातल्या ५ ओव्हर या पॉवर प्लेच्या असतील. या मॅचमधून मिळणारं उत्पन्न ऑस्ट्रेलियान रेड क्रॉस मदत आणि पूनर्वसन फंडासाठी जाणार आहे.

पॉण्टिंग-११ टीम

रिकी पॉण्टिंग (कर्णधार), जस्टिन लँगर, मॅथ्यू हेडन, एलिस व्हिलानी, ब्रायन लारा, फोब लिचफिल्ड, ब्रॅड हॅडिन (विकेट कीपर), ब्रेट ली, वसीम अक्रम, डॅन ख्रिश्चन, ल्युक हॉज, सचिन तेंडुलकर (प्रशिक्षक)

गिलख्रिस्ट-११ टीम

ऍडम गिलख्रिस्ट (कर्णधार/विकेट कीपर), शेन वॉटसन, ब्रॅड हॉज, युवराज सिंग, एलेक्स ब्लॅकवेल, एन्ड्र्यू सायमंड्स, कॉर्टनी वॉल्श निक रायवोल्डट, पीटर सीडल, फवाद अहमद, टीम पेन(प्रशिक्षक)