विराट कोहलीचे गैरवर्तन, दंडात्मक कारवाई

पाऊस आल्याने टीम इंडियाचा कर्णधार नाराज झाला. या नाराजीचा राग त्यांने चेंडूवर काढला. त्यामुळे मैदानावरील या गैरवर्तानामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 16, 2018, 05:23 PM IST
विराट कोहलीचे गैरवर्तन, दंडात्मक कारवाई  title=

दक्षिण आफ्रिका : पाऊस आल्याने टीम इंडियाचा कर्णधार नाराज झाला. या नाराजीचा राग त्यांने चेंडूवर काढला. त्यामुळे मैदानावरील या गैरवर्तानामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग

खेळ सुरु असताना अचानक पाऊस आला. त्यामुळे सेंच्युरियन कसोटीच्या मैदानावर विराट कोहलीने चेंडू जोराने खाली आपटला. या गैरवर्तानामुळे विराट कोहलीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसा निर्णय पंचानी घेतला. विराटने आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.  विराटच्या मानधनातून २५ टक्के रक्कम कापली जाणार आहे.

कसोटीचे पारडे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने!

दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात आफ्रिकन टीमचे दोन गडी बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले आहे. या कसोटीचे पारडे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकले आहे. या कसोटीत तिसऱ्या दिवशी खेळ थांबला, त्या वेळी दक्षिण आफ्रिकेने दोन बाद ९० धावांची मजल मारली होती. पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळं चहापानानंतरच्या सत्रात केवळ दहा षटकांचा खेळ होऊ शकलेला नाही.