नवी दिल्ली : स्टम्पच्या मागे उभा असलेल्या टीम इंडियाचा 'बाहुबली' महेंद्रसिंग धोनी याला कोणताही खेळाडू चकमा देऊ शकत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेसोबत खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये धोनीनं पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय.
टीम इंडियाला या मॅचमध्ये श्रीलंकेकडून हार पत्करावी लागली. पण, या मॅचमध्येही धोनीनं आपल्या बॅटींगनं आणि तेजतर्रार विकेटकिपिंगनं सगळ्यांची मनं जिंकली. धोनीनं या मॅचमध्ये ५२ बॉल्समध्ये ६३ रन्स ठोकले.
सोशल मीडियावर धोनीच्या स्टंपिंगची चांगलीच वाहवा झालेली पाहायला मिळाली. कुणी त्याला 'चाचा चौधरी के दिमाग से तेज' म्हटलं तर कुणी विजेप्रमाणे तेज असल्याचं म्हटलं.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली बॉलिंग करत असताना धनुष्का गुणातिलकनं बॉलला बॅकवर्ड स्क्वायर लेगकडे ठोकला... उमेश यादवनं हा बॉल पकडला आणि बॉल धोनीकडे फेकला... आणि डोळ्यांच्या पापण्या लवतात न लवतात तोच धोनीनं हा बॉल स्टंम्पवर फेकला... आणि टीम इंडियाला एक विकेट मिळाला.
The story of two quick run outs #INDvSL #CT17 pic.twitter.com/PCOuhSPeb3
— ICC (@ICC) June 9, 2017