१० वर्षांमध्ये तुझी जागा घेईन, लहानग्याचं विराटला आव्हान

देशभरामध्ये सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. क्रिकेट रसिक सध्या त्यांच्या आवडत्या टीमला पाठिंबा देण्यात उत्साही आहेत. 

Updated: Apr 19, 2018, 08:08 PM IST
१० वर्षांमध्ये तुझी जागा घेईन, लहानग्याचं विराटला आव्हान title=

मुंबई : देशभरामध्ये सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. क्रिकेट रसिक सध्या त्यांच्या आवडत्या टीमला पाठिंबा देण्यात उत्साही आहेत. काही फॅन्स तर मैदानात जाऊन त्यांच्या आवडत्या खेळाडूंना चिअर करत आहेत. अशाच एका चिमुरड्यानं थेट विराट कोहलीलाच चॅलेंज दिलं आहे. पुढच्या १० वर्षांमध्ये मी तुझी जागा घेईन, असं पोस्टर घेऊन हा मुलगा मैदानात पोहोचला होता. या मुलाचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. बंगळुरू आणि पंजाबमध्ये झालेली मॅच पाहण्यासाठी हा मुलगा स्टेडियममध्ये आला होता. ही मॅच बंगळुरूनं ४ विकेटनं जिंकला.

फोटो सौजन्य : बीसीसीआय

चाहत्यानं साक्षी धोनीला केलं प्रपोज

या आयपीएलमध्ये अनेकवेळा असे वेगवेगळे पोस्टर पाहायला मिळाले आहेत. एका चाहत्यानं तर चक्क धोनीची पत्नी साक्षीला प्रपोज केलं. धोनी जेव्हा चेन्नईच्या टीमला विजयाकडे घेऊन जात होता, तेव्हा या चाहत्यानं पोस्टर दाखवलं. सॉरी माही भाई, बट आय लव्ह यू साक्षी धोनी, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं होतं. 

 

SAME MATE SAME. @sakshisingh_r @mahi7781 . . #MSDhoni #SakshiDhoni

A post shared by Cricket, MSD, MahiRat Maniac (@welcome_to_msd_city) on